घरताज्या घडामोडीबार असोसिएशनचे माजी अध्यक्ष, जेष्ठ वकीलांची नदीत उडी मारून आत्महत्या!

बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष, जेष्ठ वकीलांची नदीत उडी मारून आत्महत्या!

Subscribe

पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील राजगुरूनगर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयातले जेष्ठ वकील चेंद्रशेखर कोंडीभाऊ टाकळकर यांनी आत्महत्या केली आहे. ते गेली ३० वर्ष या व्यवसायात होते. त्यांनी मंगळवारी दुपारी भीमा नदीत केदारेश्वर येथील बांधाऱ्यावरून पाण्यात उडी मारून आत्महत्या केली. ते राजगुरुनगर वकील बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष होते. आत्महत्येचे कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाच्या खेड तालुक्यातील पायाभरणीत देखील त्यांचा मोलाचा वाटा होता. त्यांच्या अचानक जाण्याने अनेकांना धक्का बसला आहे. ते अतिशय अभ्यासू, सुस्वभावी व्यक्तिमत्त्व म्हणून प्रसिद्ध होते. तसेच समाजकारण व राजकारणात त्यांचा वावर असे.

- Advertisement -

त्यांच्या पाठीमागे त्यांचे आई, वडील व भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या जाण्याने वकिली क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.


हे ही वाचा – चिंता नको! भारताची अर्थव्यवस्था योग्य मार्गावर – पंतप्रधान

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -