घरमहाराष्ट्रसोनोक्लिनिक डायग्नोस्टिक सेंटरतर्फे मोफत आरोग्य शिबिर; डॉ. भारती पवार यांच्या हस्ते कार्यक्रमाचे...

सोनोक्लिनिक डायग्नोस्टिक सेंटरतर्फे मोफत आरोग्य शिबिर; डॉ. भारती पवार यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन

Subscribe

केंद्रीय आरोग्य राज्यमत्री डॉ. भारती पवार, आमदार चंद्रकांतदादा पाटील यांची प्रमुख उपस्थिती

खासगी वैद्यकीय सुविधांचा खर्च गगनाला भिडत असताना सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार तसेच मोफत आरोग्य उपचारसुविधा मिळाव्यात, या प्रमुख उद्देशाने सोमवारी बाणेर येथे सोनोक्लिनिक डायग्नोस्टिक सेंटरच्यावतीने भव्य मोफत आरोग्य व निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. बाणेर येथील डॉ. स्नेहल बडजाते राज जगताप व टीमने रुग्णांप्रति सामाजिक बांधिलकी जोपासत त्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व केंद्रीय आरोग्य राज्यमत्री डॉ. भारती पवार यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

या आरोग्य शिबिरात पहिल्या पाच हजार रुग्णांसाठी विविध आरोग्य सुविधा अत्यल्प दरात तसेच पाच हजार नागरिकांना आजीवन मोफत शुगर हेल्थ कार्ड वितरीत करण्यात येणार आहेत. यावेळी कोव्हिड योद्ध्यांचा सत्कार समारंभही घेण्यात आला. जास्तीत जास्त नागरिकांनी या सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

- Advertisement -

अत्यल्प दरात उपलब्ध असलेल्या सुविधा

सोनोक्लिनिक डायग्नोस्टिक सेंटरमध्ये मैमॉग्राफी, सोनेग्राफी, डिजिटल एक्सरे, सीटीस्कॅन, टूडी इको हार्ट, एजीसी ब्लड शुगर, कम्प्लीट ब्लट काऊंट, ब्लड ग्रुप, तसेच मोफत रक्त तपासणी आदी सुविधा उपलब्ध आहेत. बाणेर येथील म्हाळुंगे रोडवरील वेस्ट मॉल शेजारी, क्रिस्टल एम्पायर बिल्डिंगमधील २ नंबरच्या शोरुममध्ये सोनोक्लिनिक डायग्नोस्टिक सेंटर या ठिकाणी अत्यल्प दरात आरोग्य सुविधा उपलब्ध आहेत.

सोनोक्लिनिक डायग्नोस्टिक सेंटरचे संचालक व मुख्य आयोजक डॉ. स्नेहल बडजाते, वैभव बेदरकर, तसेच राज जगताप, डॉ. सविता चव्हाण, डॉ. निमिष शाह डॉ. विनीत, डॉ. यतिन विसावे, डॉ. रोहन शेलार, डॉ. युवराज भोसले, डॉ. सोनम कागदे, डॉ. विकास पाठक, डॉ. आनंद मुंगवकर, डॉ. कृष्णाल पटेल, सचिन कासार आदींच्यावतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

- Advertisement -

सदर कार्यक्रमाला मा. खा. गिरीश बापट, मा. महापौर मुरलीधर मोहोळ, सीपीएसचे अध्यक्ष डॉ. गिरीष मैंदरकर, नगरसेवक बाबुराव चांदेरे, नगरसेवक अमोल बालवडकर, नगरसेविका ज्योती कळमकर, नगरसेविका स्वप्नाली सायकर, बी.एम.ए.चे अध्यक्ष डॉ. राजेश देशपांडे, यांची प्रामुख्याने उपस्थिती लाभली.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -