घरमहाराष्ट्रशिंदेंनी दसरा मेळाव्याच्या बससाठी १० कोटी आणले कोठून, काँग्रेसने केली ईडी चौकशीची...

शिंदेंनी दसरा मेळाव्याच्या बससाठी १० कोटी आणले कोठून, काँग्रेसने केली ईडी चौकशीची मागणी

Subscribe

शिवसेना खासदार संजय राऊत यांना ५० लाखांच्या एका व्यवहारासाठी ईडी चौकशी करून मनी लॉण्ड्रिंगच्या आरोपाखाली तुरुंगात टाकते. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मनी लॉण्ड्रिंगचा गुन्हा दाखल करून तुरुंगात टाकले जाते.

मुंबई – दसरा मेळाव्याला गर्दी जमवण्यासाठी एकनाथ शिंदे गटामार्फत राज्यातील विविध भागातून एसटी बसेस तसेच खासगी बससेमधून कार्यकर्ते आणले जात आहेत. यासाठी एसटी महामंडळाकडे १० कोटी रुपये रोख भरले असून ते मोजण्यासाठी महामंडळाला दोन दिवस लागल्याचे समजते. शिंदे गटाकडे एवढी मोठी रक्कम कोठून आली? त्यांना हा पैसा कोणी दिला? एवढ्या मोठ्या रकमेचा रोख व्यवहार करता येतो का? असे सवाल करत प्रदेश कॉंग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी  शिंदे गटाच्या  मेळाव्यासाठी झालेल्या संपूर्ण खर्चाची ईडी आणि  आयकर विभागाकडून चौकशी करावी, अशी मागणी केली आहे.

हेही वाचा – शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात बाळासाहेबांचे अॅनिमेशन अन् 51 फुटी तलवारीचे शस्त्रपूजन; वाचा कसा असेल मेळावा?

- Advertisement -

दसरा मेळाव्याच्या खर्चावर प्रश्न उपस्थित करत अतुल लोंढे म्हणाले की, मेळाव्यात शक्तीप्रदर्शन करण्यासाठी राज्यभरातून बसेसच्या माध्यमातून लोकांना मुंबईत आणले जात आहे. मेळावा यशस्वी करण्यासाठी सर्व नियम धाब्यावर बसवले जात आहेत. विशेष म्हणजे दसरा मेळाव्यासाठी एसटी बसेस बुक करताना शिंदे गटाने १० कोटी रुपये रोख दिल्याचे समजते. ही रक्कम शिवसेना पक्षाच्या खात्यातून दिली आहे का? नसेल तर ही रक्कम कुठून आणली? १० कोटींचा रोख व्यवहार कसा केला? दोन लाख जेवणाची पॅकेट्स तयार करण्यात आल्याचे समजते, यासाठी कोट्यवधींचा खर्च कोणी केला? ते पैसे कुठून आले. १० कोटी रुपये मोजण्यास २ दिवस लागल्याच्या बातम्याही प्रसारित झाल्या आहेत. शिंदे यांच्या पक्षाची अजून अधिकृत नोंदणीही झालेली नाही, मग हा पैसा कोणत्या खात्यातून आला. ही मनी लॉण्ड्रिंग तर नाही ना? याची चौकशी होणे गरजेचे आहे.

हेही वाचा – कोणाच्या ‘धनुष्यबाणा’ने रावणाचं होणार दहन

- Advertisement -

शिवसेना खासदार संजय राऊत यांना ५० लाखांच्या एका व्यवहारासाठी ईडी चौकशी करून मनी लॉण्ड्रिंगच्या आरोपाखाली तुरुंगात टाकते. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मनी लॉण्ड्रिंगचा गुन्हा दाखल करून तुरुंगात टाकले जाते. मग १० कोटी रुपये बसेससाठी आले कुठून याची चौकशी करणे महत्वाचे वाटत नाही का? ईडी आणि आयकर विभागाने याची दखल घेऊन चौकशी करावी. त्यांनी चौकशी करण्यास टाळाटाळ केली तर काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही ईडी आणि आयकर विभागाकडे रितसर तक्रार करू, असा इशारा लोंढे यांनी दिला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -