घरमहाराष्ट्रचांगल्या आरोग्यासाठी 'इट राईट' मोहीम सुरू

चांगल्या आरोग्यासाठी ‘इट राईट’ मोहीम सुरू

Subscribe

सुरक्षित आहार आणि निरोगी खाण्याचे वातावरण तयार करण्यासाठी 'योग्य खा' ही मोहीम एफएसएसएआयकडून सुरू केली आहे. ही मोहीम कलाकारांसाठी देखील राबवण्यात येणार आहे.

बदलत्या जीवनशैलीत खाण्या-पिण्याच्या अयोग्य सवयींमुळे आरोग्यावर याचे विपरीत परिणाम होतात. कमी वयात उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयविकारासारख्या समस्या निर्माण झाल्या आहेत. या समस्यांवर मात करण्यासाठी एफएसएसएआय म्हणजेच भारतीय अन्नसुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने ‘इट राईट’ म्हणजेच ‘योग्य खा’ ही मोहीम सुरू केली आहे. एफएसएसएआयकडून कार्यक्षेत्र, संरक्षण आणि निमलष्करी संस्था, शाळा, महाविद्यालये, संस्था, विद्यापीठे, कारागृह, रुग्णालये आणि आरोग्यसंस्था किंवा तत्सम ठिकाणी अशा विविध परिसरांमध्ये सुरक्षित आहार आणि निरोगी खाण्याचे वातावरण तयार करण्यासाठी ‘इट राईट कॅम्पस’ ही संकल्पना सुरू केली आहे.

अन्न आणि औषध प्रशासनाच्या सहकाऱ्याने हा उपक्रम राबवला

या अंतर्गत या ठिकाणी आरोग्यदायी आणि पोषक अन्न मिळावं यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात येणार आहेत. एफएसएसएआयने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांच्या अनुषंगाने अन्न आणि औषध प्रशासनाच्या सहकाऱ्याने हा उपक्रम राबवला जाणार आहे. या मोहिमेअंतर्गत अन्नपदार्थांचा दर्जा, स्वच्छता, सुरक्षा आणि त्याची गुणवत्ता या निकषांचं महत्त्व पदार्थ निर्मात्यांना आणि विक्रेत्यांना समजावून सांगितलं जाणार आहे.

- Advertisement -

कलाकारांसाठीही इट राईट मोहीम 

चित्रपट सृष्टीत काम करणारे अभिनेते आणि त्यांच्यासोबत पडद्यामागे काम करणाऱ्या लोकांच्या जेवणाच्या वेळा ठरलेल्या नसतात. त्यामुळे, कलाकारांसाठीही इट राईट मोहीम राबवली जाणार आहे.

मुंबई सेंट्रल इट राईट स्टेशन 

काही वेळा रेल्वेस्थानकांवर मिळणारे पदार्थ हे आरोग्याच्या दृष्टीने पोषक नसतात. त्यामुळे, सामान्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. एफएसएसआयएने मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावरील खाद्यपदार्थांच्या विक्रेत्यांना प्रशिक्षण दिलं आहे. या मोहिमेला पाठिंबा देण्यासाठी आणि ईट राइट कॅम्पस (ईआरसी) च्या अजेंडाला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक संस्थांमध्ये नोडल ऑफिसर नेमण्याची सूचना आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -