घरमहाराष्ट्रगणेशोत्सवासाठी रत्नागिरीत जाताय? मग RTPCR चाचणी बंधनकारक, नवी नियमावली जारी

गणेशोत्सवासाठी रत्नागिरीत जाताय? मग RTPCR चाचणी बंधनकारक, नवी नियमावली जारी

Subscribe

राज्यात कोरोनाची दुसरी लाट संपत नाही तोवर तिसऱ्या लाटेचा धोका व्यक्त केला जात आहे. अशातच राज्यात एकापाठोपाठ एक अशा सण-समारंभांची लगबग सुरु झाली आहे. यात अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सव सण येऊन ठेपला आहे. त्यामुळे कोकणात गणेशोत्सवानिमित्त होणाऱ्या गर्दीमुळे कोरोना संसर्ग वाढू नये यासाठी रत्नागिरी जिल्हा प्रशासनाकडून योग्यत्या उपाययोजना राबवल्या जात आहे. ही गर्दी रोखण्यासाठी रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने नवी नियमावली जारी केली आहे. या नव्या नियमावलीनुसार, रत्नागिरी जिल्ह्यात इतर जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांनी लसीचे दोन घेणे गरजेचे आहे. मात्र ज्या नागरिकांचे लसीचे दोन डोस पूर्ण झाले नसतील अशा नागरिकांना रत्नागिरी जिल्ह्यात प्रवेश करताना RTPCR चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. याशिवाय जिल्ह्यात प्रवेश करताना किमान ७२ तासापूर्वीचे रिपोर्ट दाखवणे आता बंधनकारक आहे. रिपोर्ट नसल्यास जिल्ह्यात प्रवेश करण्याआधी त्या व्यक्तीची चाचणी केली जाईल, यावेळी चाचणी रिपोर्ट पॉझिटीव्ह आढळल्यास त्या व्यक्तीला संस्थात्मक विलगीकरणात ठेवले जाईल.

गणेशोत्सवानिमित्त रत्नागिरी प्रशासनाची नवी नियमावली

१) गणेशोत्सावादर्मान कोरोनाचा उद्रेक होऊ नये यासाठी मास्क वापरणे गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळणे, हात सतत धुवून स्वच्छ करणे तसेच सुरक्षित अंतर राखणे या शासनाच्या त्रिसूत्रीचे पालन करावे लागणार आहे.

- Advertisement -

२) भजन , आरती, किर्तन किंवा सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये गर्दी होणार नाही याबाबत काळजी घ्यावी.

३) प्रवास करताना एसटी, रेल्वेमध्ये प्रवाशांनी करोना संसर्ग नियमाचे पालन करणे आवश्यक आहे व त्याची जबाबदारी वाहक व चालक यांची असेल.

- Advertisement -

४) गणेश आगमन आणि विसर्जन मिरवणूका काढू नये असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केल्या आहेत.

५) प्रशासनाच्या नियमांप्रमाणे, गणेशमूर्ती, गणेशोत्सवाची सजावट, आरास करताना प्रशासनाने बंदी घातलेल्या प्लॅास्टीक, थर्माकोल याचा वापर टाळून नैसर्गिक वस्तूंपासून आकर्षक आरास करावी.

६) घरच्या घरी गणेश विसर्जन करणे शक्य नसेल तर कृत्रिमरित्या तयार करण्यांत आलेल्या तलाव, हौद यामध्ये गर्दी न करता करावे, स्थानिक प्रशासनाने गणेशमूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम हौद, तलाव यांची निर्मिती करावी. तसेच निर्माल्य टाकण्यासाठी निर्माल्यकलशांची ठिकठिकाणी निर्मिती करावी.

७) गणेश विसर्जन घराजवळच करावे. शक्य असल्यास हौद, कृत्रिम तलावांचा वापर करावा.

८) श्रीगणेशाचा प्रसाद देणे टाळावे अथवा सुका मेवा / सुके पदार्थ पूर्ण फळ याचा प्रसाद दयावा, मिठाईमध्ये होणारी भेसळ रोखण्यासाठी आवश्यक ते नियोजन करणेबाबत अन्न व औषध प्रशासनाला सूचना देण्यात आलेल्या आहेत.

९) गणेशोत्सव कालावधीत अपघात टाळण्याच्या दृष्टीने रस्त्यांवरील अवजड वाहतूक बंद ठेवण्याचे निर्देश.

१०) गणेशोत्सवामध्ये सार्वजनिक गणपती बसवण्यात येऊ नयेत असे जिल्हा प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे. तथापि, सार्वजनिक गणपती बसविल्यास तो दीड दिवसाचा असावा, असे आवाहन करण्यात येत आहे.


Tokyo 2020 Paralympics : भाविना पटेलनं टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये भारताला जिंकून दिलं पहिलं पदक, रौप्यपदकावर कोरलं नाव


 

 

 

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -