घरक्राइम"मला सोडा अशी विनवणी ती करत होती पण..." छत्रपती संभाजीनगरमधील घटनेने खळबळ

“मला सोडा अशी विनवणी ती करत होती पण…” छत्रपती संभाजीनगरमधील घटनेने खळबळ

Subscribe

गेल्या काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरमध्ये कायद्याचे तीनतेरा वाजले आहेत. नागरिकांना पोलीस आणि कायद्याची भिती राहिली नसल्याने येथील गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ होत असतात. काही व्हिडीओंच्या माध्यमातून चांगली माहिती मिळत असते. तर काही घटनांमुळे रागाचा पारा देखील चढतो. सोशल मीडियावर एका तरूणीची काही तरूण छेड काढत असल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. छत्रपती संभाजीनगरमधील हा धक्कादायक व्हिडीओ असल्याचे सांगण्यात आले आहे. काही तरूण हे या तरूणीची छेड काढत असताना या घटनेचा व्हिडीओ देखील तयार करण्यात आला. या व्हिडीओमध्ये ही तरूणी त्या मुलांना तिला सोडण्याती विनवणी करताना दिसत आहे. पण त्या तरूणांकडून त्रास देण्यात येत आहे. धक्कादायक बाब म्हणजे सदर तरूणी ही मुस्लीम असून ती एका हिंदू मुलासोबत फिरत असल्याने तिच्यासोबत ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगरमध्ये येथे एक तरूणी तिच्या मित्रासोबत बिबी-का-मकबरा पाहण्यासाठी गेली होती. यावेळी त्याठिकाणी तिच्याच ओळखीच्या काही तरूणांनी तिला त्या मुलासोबत फिरताना पाहिले. पण तो मुलगा हिंदू असल्याने आणि मुलगी मुस्लीम असल्याने त्या तरूणांनी तिला त्रास देण्यास सुरूवात केली. या घटनेच्यावेळी तरूणीच्यासोबत असलेल्या तरूणाने घाबरून घटनास्थळावरून काढला. ज्यानंतर ही तरूणी एकटीच त्या तरूणांच्या तावडीत सापडली. ज्यानंतर या टवाळखोर तरूणांनी त्या मुलीचा स्काफ (हिजाब) खेचत तिच्या हातातील मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला.

- Advertisement -

हेही वाचा – ‘सत्तेच्या लाचारीपोटी जनहिताचे प्रकल्प निरुद्योगी मंत्र्यांनी…’ – विनायक राऊत

सदर घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ या घटनेची दखल घेतली. त्यानंतर पोलिसांनी त्या तरूणीला तिच्या पालकांसोबत पोलीस स्टेशनला बोलावून घेतले. पण तिच्या आई-वडिलांनी या घटनेची तक्रार दाखल करण्यास नकार दिला. तर मुलीला त्रास देणारे मुलं ही त्यांच्या परिचयाचे असल्याचे मुलीच्या पालकांकडून सांगण्यात आले आहे. तसेच हे प्रकरण आपापसांतील असल्याने तरूणीच्या पालकांनी या प्रकरणाची तक्रार दाखल करण्यास नकार दिल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

- Advertisement -

सदर घटना 24 एप्रिलला घडली असून या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत बेगमपुरा पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी या प्रकरणाची तक्रार नोंदवून घेतली असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. तर सदर तरूण हे तरूणीच्या बाजूलाच राहणारे असून तिच्या ओळखीतील असल्याचे सांगण्यात आले आहे. तर या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आले असून पोलिसांकडून या घटनेचा अधिक तपास करण्यात येत आहे. तसेच या प्रकरणी गुन्हा नोंदवला जाऊ शकते असे सांगण्यात येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -