Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश सहा महिन्यानंतर पुन्हा होणार post martem; कलकत्ता हायकोर्टाचे आदेश

सहा महिन्यानंतर पुन्हा होणार post martem; कलकत्ता हायकोर्टाचे आदेश

Subscribe

 

कोलकाताः सात महिन्यापूर्वी संशयास्पद मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे पुन्हा पोस्ट मार्टम करण्याचे आदेश कलकात्ता उच्च न्यायालयाने दिले आहेत. या विद्यार्थ्याचे दफन केलेले शव काढा. ते शव कोलकाताला घेऊन या आणि पोस्ट मार्टम करा, असे न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे.

- Advertisement -

फैजान अहमद असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. तो खरगपूर आयआयटीमध्ये शिकत होता. गेल्या वर्षी १४ आॉक्टोबरला त्याचे शव आयआयटी संकुलातील वसतीगृहात सापडले होते. फैजानने आत्महत्या केल्याचा दावा महाविद्यालय प्रशासनाने केला आहे. मात्र ही आत्महत्या नसून हत्या आहे, असा संशय फैजानच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. सत्यापर्यंत पोहोचण्यासाठी पुन्हा शवविच्छेदन करण्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त करत न्यायालयाने वरील आदेश दिले आहेत.

याप्रकरणी न्या. राजशेखर मंथा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. असम येथे फैजानचे शव मुस्लिम पद्धतीने दफन करण्यात आले आहे. फैजानचे शव बाहेर काढण्यास त्याच्या कुटुंबीयांनी परवानगी दिली आहे. असम पोलिसांनी दफन केलेले शव बाहेर काढण्यासाठी तारीख आणि वेळ निश्चित करावी. तपास अधिकाऱ्यांशी सल्लामसलत करुन शवविच्छेदन करावे, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

पोलिसांना घटनास्थळी एक रसायन सापडले होते. या रसायनाचा वापर मांस सुरक्षित ठेवण्यासाठी केला जातो. तीन दिवस फैजानचे शव बंद खोलीत होते. तरीही दुर्गंधी आली नाही. फैजानच्या मृत्यूवर संशय निर्माण होत आहे. फैजानच्या मृत्यूचे सत्य शोधण्यासाठी याची नव्याने चौकशी होणे गरजेची आहे, असेही न्यायालयाने नमूद केले.
- Advertisement -

उत्तर प्रदेशमध्येही फेब्रुवारी महिन्यात अशाच प्रकारची घटना घडली. मृत्यूचे कारण शोधून काढण्यासाठी दफन केलेला मृतदेह शवविच्छेदनासाठी पुन्हा बाहेर काढण्यात आला. कानपूरमधील बिथूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नरामाऊ येथे धक्कादायक घटना घडली. पोलिसांच्या बंदोबस्तात वसीम मोहम्मदचा मृतदेह नरामाऊ स्मशानभूमीतून बाहेर काढण्यात आला. शवविच्छेदनासाठी त्याचा मृतदेह पाठवण्यात आला. मुलाचा मृतदेह बाहेर काढताना पाहून नातेवाईकांनी आक्रोश केला. दरम्यान, मुलाच्या मृत्यूचे कारण जाणून घेण्यासाठी त्याच्या आईने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना आवाहन केलं.आई रोशन जहाँ यांनी मुख्यमंत्र्यांच्या पोर्टलवर तक्रार केली होती. वडील सईद मोहम्मद यांनी कानपूर जिल्हा दंडाधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती आणि मुलाच्या मृत्यूचे खरे कारण जाणून घेण्यासाठी मृतदेह स्मशानामधून काढून पोस्टमार्टम करण्याची मागणी केली होती.  ACM III GN सरोज आणि ACP कल्याणपूर विकास कुमार पांडे, बिथूर चौबेपूर मानधना पोलिसांच्या उपस्थितीत, मृतदेह स्मशान भूमितून बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.

 

- Advertisment -