घरमहाराष्ट्रयंदाचे गणपती विसर्जन उशिरा होण्याची शक्यता

यंदाचे गणपती विसर्जन उशिरा होण्याची शक्यता

Subscribe

बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती

यंदाच्या वर्षी शहरातील सार्वजनिक गणपती विसर्जनाला विलंब होणार आहे. कारण शहरातील कमकुवत, जर्जर झालेल्या पुलांवरून एकच गणपतीची मूर्ती फक्त १० ते १५ कार्यकर्त्यांसोबत न्यावी लागणार आहे. बाकीच्या गणेशभक्तांना पुला खालून जावे लागणार आहे. गणेशभक्तांवर नजर ठेवण्यासाठी मुंबईतील २६ पुलांवर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे गणेश विसर्जन मिरवणुकीला वेळ लागणार आहे.

बापाच्या आगमनाला अवघे आठ दिवस शिल्लक असताना वाहतूक व्यवस्थेसह सर्व तयारी प्रशासनाने केली आहे. विसर्जनाच्या दिवशी कमकुवत, जर्जर झालेल्या पुलांवर नाचू नका अशी सूचना मुंबई महापालिका प्रशासनाने गणेश मंडळांना केली आहे. नाच-गाण्यामुळे दाब येऊन पुलाचे आणखी नुकसान होऊ शकते. गणेश भक्तांनी पुलावर जास्तवेळ रेंगाळू नये. त्यांनी शांतपणे पूल पार करावा अशी सूचना महापालिका प्रशासनाने सर्वच गणेश मंडळांना केली आहे.

- Advertisement -

मुंबईत पूल कोसळून जिवीतहानी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळेही दक्षता घेण्यात येत आहे. यंदा विसर्जनावेळी फक्त पुलावरून एक गणपती आणि गणेशोत्सव मंडळातील १० ते २० गणेशभक्तांना मूर्तीसोबत पुलावरून जाता येणार आहे. पूल पार केल्यानंतर भक्तांना नाचता येणार आहे. मुंबई महानगर पालिकेने दक्षता म्हणून हे निर्देश सर्वच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला दिले आहे.

रंगीत तालीमही केली
नुकतेच चिंचपोकळीच्या चिंतामणीचा आगमन सोहळा पार पडला. चिंचपोकळीच्या पुलावर पालिकेने रंगीत तालीम केली. त्यावेळी मूर्तीसोबत २० लोकांना घेऊन पूल पार केला होता. त्यानंतर गणेशभक्तांना पुला खालून येण्यास सांगण्यात आले होते. हा प्रयोग यशवस्वी झाला होता. त्यामुळे अशा पद्धतीने इतर २६ पुलांवरून सार्वजनिक गणपतीचे विसर्जन करण्यात येणार आहे.

- Advertisement -

मुंबईत महापालिका प्रशासनाने गणेश मंडळांना केल्या सूचनाचे पालन करत मुंबईतील सर्व गणेशोत्स मंडळांना आम्ही समन्वय समितीकडून आवाहन करण्यात आले आहे कि, यंदा गणपती विसर्ज लवकरात लवकर करावेत. जेणेकरून गणपती विसर्जनाला उशीर होणार नाही.
-नरेश दहिबावकर, अध्यक्ष बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -