घरमहाराष्ट्रहे चाललंय काय? पहिल्या टप्प्यात EVM बिघाडाच्या ३९ तक्रारी!

हे चाललंय काय? पहिल्या टप्प्यात EVM बिघाडाच्या ३९ तक्रारी!

Subscribe

पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रात इव्हीएम मशिन बिघाडाच्या ३९ तक्रारी आल्या असून त्यासंदर्भात काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे.

विदर्भातल्या ७ मतदारसंघांमध्ये लोकसभा निवडणुकीसाठीच्या पहिल्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे. यावेळी मतदारांचा सकाळपासून उत्साह मतदान केंद्रांबाहेर दिसत असतानाच आत मतदान केंद्रांमध्ये मात्र गडबड सुरू असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या ७ लोकसभा मतदारसंघांमध्ये एकूण ३९ मतदान केंद्रांवरील EVM मशीनमध्ये बिघाड झाल्याच्या तक्रारी आल्याचं स्पष्ट झालं आहे. यासंदर्भात प्रदेश काँग्रेसने मेल करून निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे.

नागपुरातून आल्या सर्वाधिक तक्रारी

आज विदर्भातल्या वर्धा, रामटेक, नागपूर, यवतमाळ-वाशिम, चंद्रपूर, गडचिरोली-चिमूर, भंडारा-गोंदिया या ७ मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे. नागपूरमधून नितीन गडकरी यांच्या मतदारसंघात देखील पहिल्या टप्प्यात मतदान होत असल्यामुळे हा टप्पा महत्त्वाचा मानला जात आहे. मात्र, EVM मशिनमध्ये बिघाड झाल्याच्या तक्रारी आल्यामुळे घोळ झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.

- Advertisement -

किती केंद्रांवर आल्या तक्रारी?

वर्धा – ६ मतदान केंद्र
रामटेक – ५ मतदान केंद्र
नागपूर – १२ मतदान केंद्र
यवतमाळ-वाशिम – ४ मतदान केंद्र
चंद्रपूर – ८ मतदान केंद्र
गडचिरोली – ४ मतदान केंद्र

Congress Letter on EVM Failure
इव्हीएम मशीनमधील बिघाडावर काँग्रेसचं निवडणूक आयोगाला तक्रारपत्र

विशेष म्हणजे यातल्या नितीन गडकरींचा मतदारसंघ असलेल्या नागपुरातून सर्वाधित तक्रारी आल्यामुळे विरोधकांनी याचा मुद्दा करण्याचा पवित्रा घेतला आहे. यासंदर्भात प्रदेश काँग्रेसने निवडणूक आयोगाकडून इमेलद्वारे तक्रार दाखल केली आहे. यावर आता निवडणूक आयोगाकडून काय पाऊल उचललं जातं, हा औत्सुक्याचा विषय आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -