घरमहाराष्ट्रजयंती विशेष : अशी मिळाली जोतीराव फुलेंना 'महात्मा' उपाधी

जयंती विशेष : अशी मिळाली जोतीराव फुलेंना ‘महात्मा’ उपाधी

Subscribe

क्रांतीसूर्य जोतीराव फुले यांची आज १९२ वी जयंती आहे. शिक्षणाचे सार्वत्रिकरण, लिंग भेदावर आधारीत विषमतेला मूठमाती, जातीनिर्मुलन, शेती आणि उद्योगातील सचोटी यासारख्या असंख्या प्रश्नांवर फुले यांनी आपले प्रखर विचार प्रकट केले. किंबहुना ते जनमाणसात रुजवले देखील. भारतात आतापर्यंत दोनच व्यक्तिंना महात्मा म्हणून संबोधले गेले आहे. त्यापैकी एक जोतीराव फुले तर दुसरे आहेत महात्मा गांधी… मात्र गांधींनी एका भाषणात बोलताना सांगितले की, “मी कसला महात्मा, खरे महात्मा तर जोतीराव फुले आहेत.” जोतीराव फुले यांना महात्मा ही उपाधी मिळाली कशी, याबद्दल जाणून घेऊया…

फुले यांच्या जीवन चरित्राचे अभ्यासक हरी नरके यांनी याबाबत संशोधन केलेले आहे. ही गोष्ट आहे जवळपास सव्वाशे वर्षांपूर्वीची. मुंबईतल्या भायखळ्यात कामगारांनी फुले यांचा ६१ व्या जन्मदिनानिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. दिवस होता ११ मे १९८८. सत्यशोधक समाजाचे नेते नारायण मेघाजी लोखंडे यांच्या पुढाकाराने हा स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता. याच सोहळ्यात सर्व कामगारांनी फुले यांना महात्मा अशी उपाधी बहाल केली. जनमाणसातून एखाद्या व्यक्तिला अशी उपाधी मिळण्याची ही भारतातील पहिलीच वेळ होती.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -