घरमहाराष्ट्रपुणेRavindra Dhangekar : धंगेकरांच्या पोस्टरवर फोटो गिरीश बापटांचा, मुलाने व्यक्त केल्या भावना

Ravindra Dhangekar : धंगेकरांच्या पोस्टरवर फोटो गिरीश बापटांचा, मुलाने व्यक्त केल्या भावना

Subscribe

पुणे : लोकसभा निवडणुकीची घोषणा झाली आणि आता प्रत्येक पक्ष आपापला उमेदवार जाहीर करतो आहे. भाजपने मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी दिली. तर त्यानंतर काँग्रेसकडून कसब्यात जायंट किलर ठरलेले रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. गुरुवारी रात्री उशिरा काँग्रेसने ही यादी जाहीर केली असून त्यात रवींद्र धंगेकर यांना पुणे लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे आता पुण्यात मुरलीधर मोहोळ विरुद्ध रवींद्र धंगेकर अशीच लढत होणार आहे. पुण्याच्या या लढतीत मनसेचे माजी नेते वसंत मोरे यांनी देखील रंगत आणली आहे. पुण्यातील लढतीचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर पुण्यात प्रचाराला सुरुवात झाली आहे.

राज्यात सध्या बारामती पाठोपाठ पुण्याची निवडणूक चर्चेची झाली आहे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे भाजपा आणि काँग्रेसकडून जाहीर झालेले उमेदवार. भाजपाने माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी दिली आहे. मात्र, त्यांच्या नावाला भाजपातूनच बऱ्यापैकी विरोध होता. तर दुसरीकडे भाजपा आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या कसब्याच्या जागेवर निवडणूक लढवत जिंकून आलेल्या रवींद्र धंगेकर यांना काँग्रेसकडून लोकसभेसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. उमेदवारी जाहीर होताच प्रचाराला देखील सुरुवात झाली आहे. धंगेकर यांच्या प्रचारात एक गमतीशीर गोष्ट समोर आली. आणि त्यावरून त्यांच्यावर टीका देखील करण्यात आली.

- Advertisement -

हेही वाचा – Lok Sabha Election : मतदानासाठी निवडणूक आयोगाने दिली भरपगारी सुट्टी

दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्यासोबतचा रवींद्र धंगेकर यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. या फोटोवर जो आमदार कसब्याचा, तोच खासदार पुण्याचा, मी पुणेकर, असं म्हटलं आहे. त्यावरून आता भाजप आणि कॉंग्रेसमध्ये वाद सुरू झाला आहे. हा फोटो नेमका कोणी बनवला हे समोर आले नसले तरी काँग्रेस कार्यकर्त्यांकडून हा फोटो व्हायरल करण्यात येत आहे.

- Advertisement -

तुमच्या नेत्यांवर तुमचा विश्वास नाही का…

रविंद्र धंगेकर यांच्या या पोस्टरवर गिरीश बापट यांचे पुत्र गौरव बापट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गौरव बापट म्हणाले की, गिरीश बापटांचा फोटो वापरणं खूपच दुर्दैवी आहे. मी याचा निषेधच करतो. काँग्रेसचा स्वतःच्याच नेत्यांवर विश्वास नाही का? अशी विचारणा गौरव बापट यांनी केला आहे. भाजपचे पाच वेळा आमदार, दोन वेळा खासदार, कॅबिनेट मंत्री असलेल्या गिरीश बापट त्यांचा फोटो आपल्या प्रचारासाठी वापरणं हे कॉंग्रेच्याच नेत्यांवर विश्वास नसल्याचे चिन्ह आहे, अशी टीका गौरव यांनी केली आहे. यातून त्यांची पराभूत मानसिकता दिसून येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामावर त्यांचा विश्वास आहे. विरोधाला विरोध म्हणून ते मोदींवर टीका करतात. त्यामुळे आम्ही हे हास्यास्पद म्हणून सोडून देतोय, असे गौरव बापट म्हणाले. आपल्या नेत्यांवर विश्वास असता तर अशा गोष्टी त्यांना करण्याची गरज भासली नसती.

हेही वाचा – मोठी बातमी : शरद पवार माढ्यातून जानकरांना उमेदवारी देणार? 9 जणांची संभाव्य यादी समोर

पुण्यातील निवडणूक टफ होणार नाही

पुण्यात भाजपचा विजय निश्चित आहे. पुण्याची निवडणूक टफ होईल, असे मला वाटत नाही. आमचा उमेदवार बहुमताने विजय होईल असेही गौरव यांचे म्हणणे आहे. दुसरीकडे गिरीश बापट यांच्या निधनानंतर होणारी ही पुण्यातील पहिलीच लोकसभा निवडणूक आहे. या निवडणुकीत संपूर्ण बापट कुटुंब हे भाजपसोबत असून मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी आम्ही मैदानात उतरणार असल्याचंही ते म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -