घरठाणेमुंब्र्यात विद्युत मीटर बॉक्सला आग

मुंब्र्यात विद्युत मीटर बॉक्सला आग

Subscribe

काही काळासाठी ३०० रहिवासी घराबाहेर

ठाणे । येथील एका इमारतीमधील मीटर बॉक्सला शुक्रवारी मध्यरात्री लागलेली आग पाचव्या मजल्यापर्यंत पोहचल्यामुळे इमारती मधील ३०० ते ३५० रहिवाशांना सुरक्षिततेची उपाययोजना म्हणून काही काळासाठी घराबाहेर काढण्यात आले होते. या घटनेत तब्बल १०९ विद्युत मीटर आणि केबल जळून खाक झाले. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली असण्याची प्राथमिक शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुंब्र्यातील शिवाजी नगर परीसरात अमन हाईटस ही तळ अधिक पाच मजली इमारत आहे.

या इमारतीमध्ये १०९ घरे आहेत. इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या विद्युत मीटर बाँक्सला शुक्रवारी मध्यरात्री पावणेदोन वाजण्याच्या सुमारास आग लागली. याबाबतची माहिती मिळताच पोलीस,वीज वितरण करणार्‍या कंपनीचे कर्मचारी आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी एक फायर आणि एक रेस्क्यू वाहनासह घटनास्थळी धाव घेतली. मीटर बॉक्समध्ये लागलेली आग विद्युत केबलच्या माध्यमातून पाचव्या मजल्यापर्यत पोहचल्यामुळे तसेच आगीतून निघालेल्या धुरामुळे इमारती मधील रहिवाशांमध्ये खळबळ उडाली होती. सुरक्षिततेची उपाययोजना म्हणून इमारती मधील ३०० ते ३५० रहिवाशांना काही काळासाठी घराबाहेर काढण्यात आले होते.रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास जवानांनी आग आटोक्यात आणली.आग नियंत्रणात आणण्यासाठी स्थानिक तरुणांनी देखील मदत केली.या घटनेत कुणालाही दुखापत झाली नाही. परंतु १०९ मीटर आणि केबल जळून खाक झाल्याची माहिती ठामपाच्या अप्तकालिन कक्षातील अधिकार्‍यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -