घरताज्या घडामोडीते स्वत: कलंकित, सत्ता गेल्यामुळे बेताल वक्तव्य; गिरीश महाजनांची ठाकरेंवर टीका

ते स्वत: कलंकित, सत्ता गेल्यामुळे बेताल वक्तव्य; गिरीश महाजनांची ठाकरेंवर टीका

Subscribe

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नागपूरमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नागपुरला लागलेले कलंक असं म्हटलं होतं. त्यानंतर ठाकरे गट आणि भाजपात आरोप-प्रत्यारोपाला सुरुवात झाली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह अनेकांनी टीका केली होती. दरम्यान, ते स्वत: कलंकित असल्यामुळे दुसऱ्यांवर आरोप करताहेत असं प्रत्युत्तर भाजप नेते गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरेंना दिलं.

गिरीश महाजन यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, स्वत: आपण कलंकित असताना दुसऱ्यावर आरोप करायचे. अशा प्रकारच्या वक्तव्याची उद्धव ठाकरे यांच्याकडून अपेक्षा नाही. सत्ता गेल्यामुळे माणूस किती बेभान होतो, हे पहिल्यांदा आपण बघतोय. अनेक लोकं सत्तेत आले आणि गेले परंतु असे बेछूट वक्तव्य त्यांनी कधी केली नाहीत. मात्र, उद्धव ठाकरे ज्या पद्धतीने बोलताहेत आणि त्यांचा तोल जातोय. मला वाटतं की, सत्ता गेल्यामुळे त्यांना ते फार पचत नाहीये. त्यामुळे असं बेताल वक्तव्य ठाकरे करताहेत, असं गिरीश महाजन म्हणाले.

- Advertisement -

मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार? यावर प्रश्न विचारला असता, दोन दिवसात मंत्रीमंडळ विस्तारावर चर्चा होण्याची शक्यता आहे, असं महाजन म्हणाले.

‘कलंक’ नाही म्हणायचं तर… – सुषमा अंधारे

कलंकला कलंक नाही म्हणायचं तर काय म्हणायचं, अष्टगंध म्हणायचं का आम्ही. कलंकच आहे ते. त्यांच्या कार्यक्रमात अमित शाह आल्यानंतर चेंगराचेंगरीमध्ये ज्या श्री सदस्यांचा मृत्यू होतो. दुसऱ्यांदा अमित शाह येतात, पण श्री सदस्य मृतकांच्या घरी सांत्वन भेटही देत नाही. ही कलंकित करणारी गोष्ट नाही का? समृद्धी महामार्गावर बुलढाण्याजवळ अपघात झाला. अक्षरश: कोणाचंही प्रेम ओळखायला येत नव्हतं. त्यांचा अंतविधी चालू असताना एक पक्ष फोडून त्यांचा शपथविधी केला जातो, हे कलंकित करणारी गोष्ट नाही आहे का? इथला एक-एक उद्योग महाराष्ट्राच्या बाहेर जातो, हा कलंक नाही आहे का? इथल्या बाई-पोरी-लेकीबाळी अजिबात सुरक्षित नाही आहेत, हा कलंक नाही आहे का? वारंवार एक-एक पक्ष फोडणे आणि लोकशाही संपवणे हा कलंक नाही आहे का? जाणीवपूर्वक महाराष्ट्राचं राजकारण अस्थिर करून नको त्या गोष्टींना थारा देण्याचा प्रयत्न सुरू आहे. एवढा कलंकित कार्यक्रम करून सुद्धा देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदाची खुर्ची मिळत नाही, याचं मला वाईट वाटतं. एकदाचं देऊन टाका त्यांना मुख्यमंत्रीपदाची खुर्ची, असं ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या.

- Advertisement -

हेही वाचा : Sushma Andhare : ‘कलंक’ नाही म्हणायचं तर…; सुषमा अंधारेंनी फडणवीसांवर साधला निशाणा


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -