घरमहाराष्ट्रट्रेकिंगला गेलेली इंजिनिअर तरुणी दूधसागरमध्ये बुडाली

ट्रेकिंगला गेलेली इंजिनिअर तरुणी दूधसागरमध्ये बुडाली

Subscribe

ट्रेकिंगला जाताना सावधानता बाळगा असे अनेकदा सांगून देखील तरुणाई ट्रेकिंगला जाताना काळजी घेताना दिसत नाही. ज्याठिकाणी जाण्यास मनाई असते अशा ठिकाणी जातात आणि स्वत:चा जीव धोक्यात घातलात. अशीच एक घटना दूधसागर धबधब्याजवळ घडली आहे. ट्रेकिंगला गेलेली तरुणी बुडाली आहे.

गोव्यातील दूधसागर धबधब्यावर ट्रेकिंगसाठी आलेली तरुणी पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेल्याची घटना घडली आहे. पुण्यावरुन आलेल्या २५ वर्षांच्या या तरुणीचंं नाव सुहागता बसू असं आहे. रविवारी सकाळी सोनावली रेल्वे स्टेशनपासून काही अंतरावर ही घटना घडली आहे. सुहागता मूळची पश्चिम बंगालची असून पुण्यातील पीक महिंद्रा कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअरचे काम करत होती.

ट्रेकिंगसाठी दोन गट आले होते

पुण्यावरुन रविवारी ट्रेकिंगसाठी दोन गट गेले होते. त्यामधील एका गटामध्ये सुहागता बसू आणि तिचा एक मित्र असे दोघेजण पुण्यातील पीक महिंद्रा कंपनीतील होते. तर इतर जण वेगवगेळ्या ठिकाणचे होते. हे सर्व जण निजामुद्दीन एक्स्प्रेसमधून ट्रेकिंगसाठी आले होते. दुधसागर धबधब्यापासून काही किलोमीटर अंतरावर असणाऱ्या सोनावली स्थानकावर हे सर्वजण उतरले होते.

- Advertisement -

तिला वाचवण्याचा केला प्रयत्न

हे सर्व जण धबधब्यावर मजा करत होते. अचानक पाण्याचा प्रवाह वाढला आणि सुहागता पडली. तिला वाचवण्यासाठी तीन सहकाऱ्यांनी प्रयत्न केला मात्र पाण्याचा प्रवाह आणखी वाढल्याने तिघेही वाहून गेले. या तिघा जणांनी झाडांना पकडून धरले त्यामुळे त्यांना स्वत:चा जीव वाचवण्यात यश आले. मात्र या प्रवाहासोबत सुहागता वाहन गेली. तिला वाचवण्यासाठी त्याने केलेले प्रयत्न असफल ठरले.

सकाळपासून पुन्हा शोधमोहीमेला सुरुवात

या घटनेची माहिती मिळताच कुळे पोलीस आणि वन विभागाने घटनास्थळी धाव घेतली. या दोन्ही पथकाने शोध मोहीम सुरु केली. दिवसभर ही शोधमोहिम राबवण्यात आली मात्र सुहागता सापडली नाही. अंधारात शोध घेणे शक्य नसल्याने सायंकाळी उशीरा ही मोहीम थांबवण्यात आली. आज सकाळपासून पुन्हा शोधमोहीमेला सुरुवात केली आहे. पुणे येथील एका ट्रेकर गाईडने हा ट्रेक आयोजित केला होता. यापूर्वीही दोनवेळा तो ट्रेकर्सना घेऊन दूधसागरवर आले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -