घरमहाराष्ट्रआबांची सावली मोठी होतेय हे पाहून आनंद; जितेंद्र आव्हाडांकडून रोहितचं कौतुक

आबांची सावली मोठी होतेय हे पाहून आनंद; जितेंद्र आव्हाडांकडून रोहितचं कौतुक

Subscribe

विशेष म्हणजे रोहित पाटलांच्या यशाचं गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडांनीही कौतुक केलंय. जितेंद्र आव्हाडांनी ट्विट करत रोहित पाटील यांना शुभेच्छा दिल्यात. आर. आर. आबा यांच्या मुलाने, म्हणजेच रोहितने, आपल्या मेहनतीच्या आणि कामाच्या जोरावर, कवठे महांकाळ न पं. निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आणून दाखवली.

मुंबईः राज्यातील नगरपंचायतीचे निकाल हाती आलेले असून, अनेक पक्षांच्या नेत्यांना पराभवाची धूळही चाखावी लागलीय. तर काही नेत्यांनी आपल्या जिल्ह्यातील नगरपंचायतीवर वरचष्मा राखलाय. सध्या सांगलीतील कवठेमहांकाळ नगरपंचायतीची जोरदार चर्चा सुरू आहे. कारण माजी गृहमंत्री आर आर आबांचे चिरंजीव रोहित पाटील यांनी या नगरपंचायतीवर कब्जा मिळवलाय.

विशेष म्हणजे रोहित पाटलांच्या यशाचं गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडांनीही कौतुक केलंय. जितेंद्र आव्हाडांनी ट्विट करत रोहित पाटील यांना शुभेच्छा दिल्यात. आर. आर. आबा यांच्या मुलाने, म्हणजेच रोहितने, आपल्या मेहनतीच्या आणि कामाच्या जोरावर, कवठे महांकाळ न पं. निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आणून दाखवली. या निवडणुकीत रोहितने घेतलेले कष्ट हे कौतुकास्पद होते. आबांची सावली मोठी होतेय, हे पाहून आनंद वाटला. अभिनंदन रोहित, असं जितेंद्र आव्हाड म्हणालेत.

- Advertisement -

माझं वय 23 चं आहे, 25 होईपर्यंत विरोधकांकडे काहीच ठेवत नाही, असा इशारा दिवंगत आर आर पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांनी सांगली जिल्ह्यातील विरोधकांना दिला होता. नगरपंचायत निवडणूक प्रचारातील रोहित पाटील यांचे हे भाषण राज्यभर सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. रोहित पाटील यांनी प्रचारादरम्यान विरोधकांवर तुफानी हल्ला चढवला होता. निकालानंतर तुम्हाला माझा बाप अर्थात आर आर आबांची आठवण होईल, असा इशारा त्यांनी दिला होता. रोहित पाटील यांची प्रचाराची भाषणं चांगलीच गाजली होती.


दुसरीकडे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनीही मिळालेल्या विजयावरून रोहित पाटलांचं कौतुक केलंय. राष्ट्रवादीच्या आमदार सुमनताई पाटील यांच्या पायावर शस्त्रक्रिया झाल्याने त्यांचे चिरंजीव रोहित पाटील यांनी नगरपंचायत निवडणुकीची सर्व सूत्रे हाती घेतली होती. रोहित पाटील यांनी जोरदार भाषणं करत विरोधकांना नामोहरण केलं होतं. या निवडणुकीत रोहित पाटील यांच्या राष्ट्रवादी पॅनेलला 10, तर शेतकरी विकास पॅनलला 6 तर अपक्ष 6 जागांवर विजयी झाले आहेत. या विजयानंतर आर. आर. पाटील यांच्या मातोश्री आणि रोहित पाटील यांच्या आजी भागिरथी पाटील यांनी रोहित यांचं औक्षण केलं. हाच फोटो ट्विट करत रोहित पवार यांनी रोहित पाटील यांचं अभिनंदन केलं आहे. शाब्बास रोहित… खूप खूप अभिनंदन, अशा शुभेच्छा रोहित पवारांनी दिल्यात.

- Advertisement -

हेही वाचाः मुख्यमंत्री पद असलेला पक्ष चौथ्या क्रमांकावर फेकला गेला हे दुर्दैवी, देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -