घरमहाराष्ट्रGold Price Today: वर्षाअखेरीस सोनं खरेदी करताय? जाणून घ्या आजचा दर

Gold Price Today: वर्षाअखेरीस सोनं खरेदी करताय? जाणून घ्या आजचा दर

Subscribe

नव्या वर्षाच्या मुहूर्तावर सोनं खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर जाणून घ्या आजचा दर.

स्थानिक वायदा बाजारात आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी बुधवारी सोनेच्या भावात जबरदस्त घट पाहायला मिळाली. दरम्यान सोन्याच्या किमतीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. 2020 या वर्षाची सांगता होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असताना नव्या वर्षाच्या मुहूर्तावर सोनं खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर जाणून घ्या आजचा दर. गेल्या काही दिवसांच्या तुलनेत आजचा सोन्याचा भाव वाढलेला आहे. जळगावात सराफा बाजारात आज प्रति 10 ग्रॅमसाठी सोन्याच्या भाव 51 हजार 508 रुपये इतका आहे. तर चांदीचा भावही वाढला आहे. जळगावात चांदीचे दर 70,315 रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत आज सोन्याचा दर 51,730 रुपये प्रति तोळावर पोहोचला आहे. तर चांदीचा भाव 68 हजार 400 रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे. तर पुण्यात मात्र जळगाव, मुंबईपेक्षा सोन्याचा भाव कमी आहे. पुण्यात एक तोळा सोन्याचा भाव 49 हजार 940 रुपयांवर पोहोचला आहे. तर, चांदीचा भाव 68 हजार 400 रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे.

- Advertisement -

असा आहे आजचा भाव

  • सोने – 51,508 रुपये प्रति तोळा
  • चांदी – 70,315 रुपये प्रति किलो

बुधवारी 30 डिसेंबर रोजी सोन्याचा भाव आजच्या तुलनेने कमी होता, सोने – 51,407 रुपये प्रति तोळा तर चांदी – 69,769 रुपये प्रति किलो होते. मात्र आज वर्षाअखेरीस सोन्याला झळाली आल्याचे पाहायला मिळत आहे. देशांतर्गत मार्केटमध्ये सोन्याचा दर हा प्रति दहा ग्रॅम 63 हजारपर्यंत पोहोचण्याची शक्यता असल्याचे काही तज्ज्ञांनी सांगितले. तर येत्या वर्षात देशांतर्गत सोन्याचे भाव हे कमीत कमी 60 हजारांपर्यंत पोहोचू शकतात. तर आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये याचा भाव हा 2200 डॉलर इतका होऊ शकतो. मात्र यासाठी रुपयामध्ये स्थिरता असणे गरजेचे आहे. मात्र जर रुपया डॉलरच्या तुलनेत घसरला तर याबाबतचा अंदाज पुढे-मागे होऊ शकतो, असे देखील सांगितले जात आहे.


मुंबईकरांनो थर्टी फर्स्टची पार्टी करणार आहात? मग ही बातमी वाचाच
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -