घरमहाराष्ट्रकोकणवासीयांसाठी खुशखबर! गणेशोत्सवासाठी पश्चिम रेल्वेवर विशेष गाड्या धावणार

कोकणवासीयांसाठी खुशखबर! गणेशोत्सवासाठी पश्चिम रेल्वेवर विशेष गाड्या धावणार

Subscribe

मुंबई | गणेशोत्सवा निमित्ताने कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यासाठी आनंदाची बातमी आहे. गणेशोत्सवासाठी मध्य रेल्वेसोबत पश्चिम रेल्वेवर विशेष रेल्वे गाड्या चालवण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

गुजरातमधील उधना ते मडगाव, अहमदाबाद कुडाळ आणि उधना ते मंगळुरू या चार गाड्या पश्चिम रेल्वे मार्गावर चालवण्यात येणार आहेत. यापूर्वी गणेशोत्वासाठी दोनशेहून अधिक फेऱ्या जाहीर करण्यात आल्या आहेत. कोकणात जाणाऱ्या गाड्यासंदर्भात रेल्वेच्या संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन कोकण रेल्वे आणि पश्चिम रेल्वेकडून करण्यात आले आहे.

- Advertisement -

अहमदाबाद-कुडाळ (वसई रोडमार्ग – 6 फेऱ्या)

अहमदाबा येथून सकाळी 9.30 वाजता सुटणार आणि कुडाळला दुसऱ्या दिवशी सकाळी 4.10 वाजता पोहोचेल. कुडाळहून परतीचा प्रवास सकाळी 6.30 वाजता सुरू होईल. दुसऱ्या दिवशी दुपारी 3.30 वाजता पोहोचणार आहे. ही गाडी 13 ते 27 सप्टेंबरदरम्यान बुधवारी आणि गुरुवारी धावणार आहे.

उधना-मंगळुरू (वसई रोडमार्गा – 6 फेऱ्या)

उधना येथून रात्री 8 वाजता रवाना होणार आणि मडगाव येथून दुसऱ्या दिवशी सायंकाळी 6.30 वाजता मंगळुरू येथे पोहोचेल. ही गाडी मंगळुरूहून उधनासाठी रात्री 8.45 वाजता होईल आणि दुसऱ्या दिवशी रात्री 8 वाजता उधना येथे पोहोचेल. उधना-मंगळुरू येथे 14 ते 28 सप्टेंबरदरम्यान बुधवारी आणि गुरुवारी धावणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – काका-पुतण्यांची भेट, वादाचा समेट?

उधना ते मडगाव (वसई रोडमार्गावर 10 फेऱ्या)

उधना येथून ही दुपारी 3.25 वाजता रवाना होणार आणि मडगाव येथून दुसऱ्या दिवशी सकाळी 9.30 वाजता रवाना होणार आहे. ही गाडी 17 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबरदरम्यान शनिवारी आणि बुधवारी पश्चिम रेल्वे मार्गावर धावणार आहे.

 

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -