घरमहाराष्ट्रपुणेबेरोजगारांसाठी आनंदाची बातमी; 23 जिल्ह्यात लवकरच शिक्षक भरती - दीपक केसरकर

बेरोजगारांसाठी आनंदाची बातमी; 23 जिल्ह्यात लवकरच शिक्षक भरती – दीपक केसरकर

Subscribe

पुणे : राज्यात लवकरच शिक्षकांच्या 30 हजार पदांची भरती प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे. राज्यातील 23 जिल्ह्यातील शिक्षक पदे रक्त आहेत. या शिक्षक भरतीच्या जाहीरातीकडे लाखो उमेदवारांचे लक्ष लागले आहे.

राज्यात गेल्या काही वर्षापासून शिक्षक भरती प्रक्रिया रखडलेली आहेत. पण शिक्षक भरती प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती दीपक केसरकर दिली. यासंदर्भात राज्य सरकारकडून योग्य ती पावले उचलली जात आहे. राज्यातील शिक्षक भरती प्रक्रियेसंदर्भातील अधिक माहिती पवित्र संकेतस्थळामार्फत राबवली जाणार असल्याची माहिती दीपक केसरकरांनी दिली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – मीरा बोरवणकरांचे ‘दादां’वर आरोप; अजित पवारांना साथ देताना रोहित पवारांचा भाजपावर निशाणा

शिक्षक परिषदेसाठी दीपक केसरकर हे पुण्यात आले होते. यावेळी दीपक केसरकरांनी शिक्षक भरती प्रक्रिया लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती दिली. तसेच राज्य सरकारच्या विविध संघटनांकडून समूह शाळा दत्तक घेण्याच्या योजनेच्या निर्णयाला विरोध केला जात आहे. यावर दीपक केसरकर म्हणाले, राज्यात खासगी कंपन्यांच्या सहकार्यातून अनेक शाळांमध्ये पायाभूत सुविधा पुरविल्या जात आहे. गुन्हेगारी प्रवृत्तींच्या व्यक्तींकडून शाळ दत्तक देण्यावर बंदी आहे. सीएसआर निधीअंतर्गत शाळांना पायाभूत सुविधा पुरवण्यावर भर दिला जाईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -