घरदेश-विदेशसोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सवर सरकारची करडी नजर; चूक झाल्यास 50 लाखांपर्यंत दंड

सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सवर सरकारची करडी नजर; चूक झाल्यास 50 लाखांपर्यंत दंड

Subscribe

नवी दिल्ली : सोशल मीडियावर आपली वेगळी ओळख निर्माण करणारे इन्फ्लुएन्सर्स आणि सेलिब्रिटींवर आता सरकारची करडी नजर असणार आहे. केंद्र सरकारकडून सोशल मीडियावरील अॅटिव्ह कंटेन्ट क्रिएटर्सच्या पेड प्रमोशनबाबत नव्या गाईडलाईन्स जारी केल्या जाणार आहेत. अॅडव्हर्टायझिंग स्टँडर्ड्स कौन्सिल ऑफ इंडियाच्या गाईडलाईन्स असताना आता इन्फ्लुएन्सर्ससाठी नवे नियम जारी करण्यात आले आहेत. ज्यामध्ये दंडाची तरतूद देखील आहे.

भारतातीय जाहिरातींवर देखरेख ठेवणाऱ्या अॅडव्हर्टायझिंग स्टँडर्ड्स कौन्सिल ऑफ इंडिया या संस्थेने गेल्या वर्षी इन्फ्लुएन्सर्सना प्रमोशनल पोस्ट लेबल करणे अनिवार्य केलेय. सरकारच्या या निर्णयांचे दूरगामी परिणाम होईल असे एएससीआयशी संबंधित लोकांचे मत आहे. कारण भारतात इन्फ्लुएन्सर्सचं मार्केटिंग वेगाने वाढतेय.

- Advertisement -

कंटेन्ट निर्माता आयुष शुक्ला म्हणाले की, क्रिप्टो एक्सचेंज प्लॅटफॉर्ममधील त्रुटी, ज्यात पैसे काढणे थांबवले होते आणि अगदी आरबीआयने OCTA FX सारख्या ट्रेडिंग अॅप्सवर कारवाई केली होती. म्हणून सरकारकडून अशाप्रकारे निर्णय घेण्याची आवश्यकता होती, यामुळे रेग्युलेशन प्रमोट ट्रान्सपेरेंसीला प्रोत्साहन दिले जाईल.

या वर्षाच्या सुरुवातीला क्रिप्टोकरन्सी प्लॅटफॉर्म WOLD ने त्याच्या प्लॅटफॉर्मवरील सर्व व्यवहार थांबवले होते. यामुळे अक्षत श्रीवास्तव, अनिश सिंग ठाकूर, अंकुर वारीकू आणि अनंत लड्डा यांच्यासह ब्रँडचा प्रचार करणाऱ्या इन्फ्लुएन्सर्सवर जोरदार टीका झाली. दरम्यान क्रिएटर्स किंवा इन्फ्लुएन्सर्सच्या कंटेन्टवर प्रभावीत होत अनेक विद्यार्थी आणि तरुण त्यांचे पैसे गुंतवतात. या YouTubers ने सोशल मीडियावर वॉल्टची क्रिप्टो एफडी म्हणून जाहिरात केली होती.

- Advertisement -

गेल्या वर्षी क्रिप्टो करन्सी एक्स्चेंजला बेजबाबदार जाहिराती प्रकरणी केंद्राने फटकारले होते. यात टी 20 विश्वचषकदरम्यान टीव्ही आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर क्रिप्टो बँडच्या जाहिरांचा पूर आला होता, यावेळी अनेक क्रिप्टो प्लॅटफॉर्मच्या मार्केटिंगला स्थगिती देण्यात आली. तसेच क्रिप्टो करन्सीबाबतच्या जाहिरातींवर नियंत्रण ठेवण्यासाठी एएससीआयशी (ASCI) मार्गदर्शन तत्त्वे जारी केली आहे. व्हर्च्युअल डिजिटल मालमत्तांचे (VDA) नियमन करणाऱ्या या महत्त्वाच्या सूचना1 एप्रिलपासून लागू झाल्या आहेत.

एएससीआयशीच्या (ASCI) जूनमधील अहवालानुसार, जानेवारी ते मेदरम्यान 400 क्रिप्टो संबंधित जाहिरातींनी मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केले आहे. याबाबत एकूण तक्रारींपैकी 92 टक्के तक्रारी YouTube वरील अॅक्टिव्ह लोकांविरुद्ध नोंदवण्यात आल्या होत्या.

ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने (CCPA) जाहीर केलेल्या नव्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याप्रकरणी अॅटिव्ह यूट्यूबर्सविरोधात 10 ते 50 लाख रुपयांपर्यंत मोठा दंड आकरला जात आहे. ही नवी मार्गदर्शक तत्त्वे येत्या काही दिवसांत लागू होण्याची शक्यता आहे. एखाद्या उत्पादनाची, संस्थेची जाहिरात करण्यासाठी सोशल मीडियावरील अनेक प्रभावी यूट्यूबर्स, इन्फ्लुएन्सर्सला त्या त्या ब्रँड्सकडून पैसे दिले जातात. दरम्यान नव्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, सोशल मीडिया यूट्यूबर्स, इन्फ्लुएन्सर्स एखाद्या उत्पादनाची जाहीरात करत असतील आणि त्याचे ते पैसे घेत असतील तर त्या ब्रँडसोबत त्यांचे असलेले संबंधित जाहीर करावे लागतात.


मुंबईकरांसाठी खुशखबर! मध्य रेल्वेच्या ‘या’ नऊ स्थानकांवर करता येणार इलेक्ट्रिक वाहन चार्ज

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -