घरमहाराष्ट्रछत्रपती संभाजीनगरराज्यात 396 गावांमध्ये लम्पीचा प्रसार, कृषीमंत्र्यांच्या सिल्लोड तालुक्यात 10 जनावरांचा मृत्यू

राज्यात 396 गावांमध्ये लम्पीचा प्रसार, कृषीमंत्र्यांच्या सिल्लोड तालुक्यात 10 जनावरांचा मृत्यू

Subscribe

औरंगाबाद – महाराष्ट्रात लम्पी आजाराचा फैलाव झपाट्याने होत आहे. आता कृषीमंत्र्यांच्या मतदार संघातील एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड तालुक्यातील एका गावात 10 जनावरांचा लम्पी आजाराने मृत्यू झाला आहे. त्यामुळे पशुधन पालन करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. महाराष्ट्रातील 22 जिल्ह्यातील 396 गावामध्ये लम्पीचा प्रसार झाला आहे.

औरंगाबादमध्ये या तालुक्यात लागण –

- Advertisement -

औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड, सोयगाव, पैठण आणि गंगापूर या 5 तालुक्यांमध्ये लम्पी स्किन आजाराची लागण जनावरांमध्ये दिसून येत आहे. बऱ्याच जनावरांना तत्काळ उपचार देण्यात आले. त्यामुळे गायी-गुरे बरीही होत आहेत. मात्र, सिल्लोडमधील उंडणगावात या आजारामुळे तब्बल 10 जनावरांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. कालपर्यंत औरंगाबाद जिल्ह्यात एकाही जनावराचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली नव्हती.

लम्पीमुळे जनावरांचा बाजार बंद –

- Advertisement -

लम्पी रोगाच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण राज्यात जनावरांच्या बाजारावर बंदी घालण्यात आली आहे. औरंगाबादमध्येही जनावारांचा बाजार, जत्रा, प्रदर्शन तसेच जनावरांची ने-आण करण्यास मनाई करण्यात आली आहे. राज्याचे पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अशा तातडीच्या सूचना काल दिल्या आहेत. राज्यभरात पशुसंवर्धन विभागामार्फत जनावरांना लसीकरणाविषयी जनजागृती केली जात आहे. तसेच जनावरांवर फवारणीचे नियोजनही करण्यात येत आहे. प्रत्येक गावात मोफत लस देण्यात यावी, असे आदेशही राज्य सरकारतर्फे देण्यात आले आहेत.

वाशिमध्ये 20 जनावरांना लम्पी आजार –

वाशिमच्या रिसोड तालुक्यातील वाकद आणि खडकी सदार येथे जनावरांना लम्पी आजाराची लागण झाली आहे. लम्पी प्रतिबंधासाठी 10 हजार लस प्राप्त झाल्या आहेत. जनावरे बाधित आढळून आलेल्या परिसरातील पाच किलोमीटर अंतरावरील जनावरांचे लसीकरण करण्यात येणार आहे. रिसोड तालुक्यात एकूण 20 जनावरांना लम्पी आजार झाला आहे. त्यापैकी 12 जनावरे बरी झाली आहेत. 8 जनावरांवर उपचार सुरू असल्याचे पशुसंवर्धन विभागाकडून सांगण्यात आले.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -