घरमहाराष्ट्रनाशिकगोविंदनगर, आनंदवली, समाजकल्याण परिसर कंटेन्मेंट झोनपासून मुुक्त

गोविंदनगर, आनंदवली, समाजकल्याण परिसर कंटेन्मेंट झोनपासून मुुक्त

Subscribe

संशयित पेशंट नसल्याने निर्णय; बजरंगवाडी, जनरल वैद्यनगरला नवीन झोन जाहीर

कोरोना रुग्ण बरे झाल्यानंतर महापालिकेने केलेल्या वैद्यकीय तपासणीत एकही नवा संशयित रुग्ण न आढळल्याने शहरातील गोविंदनगर, गंगापूररोडवरील आनंदवली तसेच समाजकल्याण कार्यालय परिसरातील प्रतिबंधित क्षेत्र रद्द करण्याचा निर्णयमहापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी घेतला आहे. दरम्यान, बजरंगवाडी तसेच जनरल वैद्य नगर येथे पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने आता हे परिसर कॅटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले आहेत.
गोविंदनगरमधील मनोहरनगर भागात नाशिक शहरातील पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला होता. त्यामुळे गोविंदनगर, मनोहरनगरचा समावेश असलेला तीन किलोमीटर व्यासाचा परिसर ६ एप्रिलपासून प्रतिबंधित क्षेत्र म्हणून महापालिका आयुक्तांनी जाहीर केला होता. त्यापाठोपाठ गंगापूररोडवरील आनंदवली व नाशिक-पुणे रोडवरील समाजकल्याण परिसरातील निवारागृहात कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने हा परिसर अनुक्रमे ९ एप्रिल व १५ एप्रिलपासून प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आला होता. रुग्ण आढळल्यानंतर १४ दिवस या प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आला होता. या दरम्यान महापालिकेच्या वैद्यकीय पथकांमार्फत या प्रतिबंधित क्षेत्रात नागरीकांची आरोग्य तपासणी केली जात होती. कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांना क्वारंटाईन करून त्यांची देखील कोरोना तपासणी करण्यात आली. उपचाराअंती संबंधित कोरोना रुग्ण बरे झाले. त्यांचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आढळून आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. त्यानंतरी गोविंदनगर, आनंदवली व समाजकल्याण कार्यालय परिसरात प्रतिबंधित क्षेत्र कायम ठेवण्यात आला होता. या क्षेत्रातील नागरिकांची वैद्यकीय तपासणी सुरूच होती. या तपासणी दरम्यान या तिनही प्रतिबंधित क्षेत्रातील परिसरात एकही कोरोना बाधित रुग्ण आढळला नाही. त्यामुळे गोविंदनगर, आनंदवली व समाजकल्याण परिसरातील प्रतिबंधित क्षेत्र रद्द करण्याचा निर्णय आयुक्त गमे यांनी घेतला आहे. यासंदर्भातील आदेश त्यांनी जारी केले आहेत.

पूर्वीचे नियोजन केले रद्द

महापालिका प्रशासनाने यापूर्वी जाहीर केल्याप्रमाणे गोविंद नगर आणि आनंदवलीचा कंटेन्मेंट झोन अनुक्रमे १८ मे आणि २२ मे रोजी मुक्त होणार होता. परंतु या भागात काही दिवसांपासून हायरिस्क पेशंट आढळून न आल्याने नियमाप्रमाणे हे दोन्ही झोन मुक्त करण्यात आले. यासंदर्भात आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या स्वाक्षरीने अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे.

- Advertisement -

बजरंगवाडी, वैद्य नगरात आता प्रतिबंध

एकीकडे शहरातील दोन कंटेन्मेंट झोन मुक्त झालेले असताना मंगळवारी बजरंगवाडी परिसर कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला. या परिसरातील एका गर्भवती महिलेचा करोनामुळे मृत्यू झाल्याने हा परिसर प्रतिबंधित करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे एका खासगी हॉस्पिटलमध्ये कार्यरत असलेल्या एका महिलेचा करोना रिपोर्ट दोन दिवसांपूर्वी पॉझिटिव्ह आला. त्यामुळे ही महिला रहाते तो जनरल वैद्यनगरमधील वृदांवन कॉलनी परिसर कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर केला. या परिसराची पहाणी आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी वैद्यकीय पथकासह केली. परिसरातील रहिवाशी शासकीय नोकरी अथवा रुग्णसेवेत कार्यरत असेल तर अशा रहिवाशांना बाहेर जाण्यासाठी शासनाच्या सूचनेप्रमाणे परवानगी मिळावी यासाठी विभागीय अधिकार्‍यांना सूचना देण्यात आल्यात.

कंटेनमेंट झोन म्हणजे काय?

ज्या घरामध्ये कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आला आहे, त्या घराला एपिसेंटर (किंवा मध्यवर्ती) मानून त्याच्या आसपासचा साधारणत: 500 मीटरचा परिसर ही सील केला जातो. यालाच कंटेनमेंट झोन (Containment Zone) म्हटले जाते. Contain करणे म्हणजे एखाद्या गोष्टीला आवर किंवा आळा घालणे. दाटीवाटीच्या शहरी भागात अधिकार्‍यांनी हा परिसर निश्चित करावा, असे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने आपल्या वेबसाईटवर सांगितले आहे.

- Advertisement -

असे करतात कॉन्टॅक्ट ट्रेसिंग

कोरोनाबाधित रुग्ण किंवा संशयित रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांवर 28 दिवस पाळत ठेवली जाते. या व्यक्तींची लिस्ट बनवली जाते. वरिष्ठ अधिकारी याबाबत कंट्रोल रूमला माहिती देतात. कंट्रोल रूमकडून या अधिकार्‍यांना कोणत्या परिसरात चौकशीची गरज आहे याची माहिती पोहोचवली जाते.

प्रतिबंधित क्षेत्रासाठी हे असतील नियम:

  1. या क्षेत्रातील व्यक्ती घर सोडून बाहेर येऊ शकणार नाही
  2. बाहेरचा कोणीही व्यक्ती प्रतिबंधित क्षेत्रात जाऊ शकणार नाही
  3. अत्यावश्यक कामासाठी जाणार्‍या व्यक्तीची तपासणी केली जाणार
  4. वरिष्ठ अधिकार्‍यांद्वारे तपासणी होईपर्यंत लक्षणे असलेल्या व्यक्तीला घरात आयसोलेट केले जाईल
  5. मागील 14 दिवसात श्वसनाचे आजार असलेल्यांची पुन्हा तपासणी केली जाईल
  6. अत्यावश्यक सेवेचा वापर या क्षेत्रातील व्यक्ती करु शकतील
  7. परिसरात बॅरिकेटिंग लावण्यात येतील, जेणेकरुन वाहने ये-जा करणार नाहीत
  8. या आदेशाचे पालन न करणार्‍यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल
  9. या क्षेत्रात पोलिसांकडून २४ तास करण्यात येईल पेट्रोलिंग
  10. प्रतिबंधित क्षेत्रात येणार्‍या जाणार्‍या व्यक्तींच्या दैनंदिन नोंदी ठेवण्यात येतील.
  11. या क्षेत्रात विशेष पथकाव्दारे १४ दिवस घरोघरी सर्वेक्षण करुन संशयित रुग्णांचा शोध घेण्यात येईल
  12. बाधित रुग्णाच्या सानिध्यातील व्यक्तींचा शोध घेण्यात येईल
  13. संपूर्ण परिसर निर्जंतुक करण्यात येईल
  14. प्रतिबंधित क्षेत्रात घंटागाडी नियमीतपणे येईल
  15. करोना, नाशिक, पॉझिटिव्ह, जिल्हा, मालेगाव, रुग्ण, सील, प्रतिबंधित क्षेत्र

ता

गोविंदनगर, आनंदवली, समाजकल्याण परिसर कंटेन्मेंट झोनपासून मुुक्त
Hemant Bhosalehttps://www.mymahanagar.com/author/bhemant/
गेली २० वर्षांपासून पत्रकारितेत. अंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय राजकीय घडामोडींवर सातत्याने लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -