घरCORONA UPDATEकाय सांगता, शरद पवारांनी कोरोनाची लस टोचून घेतली? या वयातही बिनधास्त फिरतात

काय सांगता, शरद पवारांनी कोरोनाची लस टोचून घेतली? या वयातही बिनधास्त फिरतात

Subscribe

‘कोरोनाचा प्रभाव कधी संपणार? तर जेव्हा शरद पवार साहेब बाहेर पडणार तेव्हा?’ अशा आशयाचा एक मेसेज व्हॉट्सअपवर काही महिन्यांपूर्वी व्हायरल झाला होता. या मेसेजमधील गमंतीचा भाग असा की पवार साहेब काळाची पावले ओळखून निर्णय घेत असतात. त्यामुळे ते जेव्हा बाहेर पडतील तेव्हा कोरोनाचा प्रभाव कमी झालेला असेल, असा त्याचा अर्थ होता. मात्र पुण्यात सध्या वेगळीच अफवा पसरली आहे. शरद पवार यांनी पुण्यातील सीरम इन्स्टिट्युटला दोनदा भेट दिल्यामुळे त्यांनी कोरोनाची लस टोचून घेतली असे बोलले जात आहे. आज शरद पवार यांना पुण्यातील पत्रकार परिषदेत देखील हा प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा त्यांनीच याचा खुलासा केला.

शरद पवार म्हणाले की, “हे खरं आहे की मी दोनदा सीरम इन्स्टिट्युटला भेट दिली. यापुर्वी मी १ ऑगस्ट रोजी तिथे गेलो होतो. सीरमने कोरोनावरील लस बनविण्याचे काम हाती घेतलेले आहे. या कामातील प्रगती पाहण्यासाठी मी तिथे गेलो होतो. आजही मी सीरमला भेट देऊन हे काम कुठवर आलंय याची माहिती घेतली. मात्र माझ्या भेटीनंतर काही वेळातच मी लस टोचून घेतल्याची माहिती बाहेर पसरली. मी सीरममध्ये लस घेतली आहे.”, असे पवार यांनी सांगितले. यासोबत लसीचा तपशीलही पवार यांनी पत्रकार परिषदेत दिला.

- Advertisement -

“मी घेतलेली लस ही रोगप्रतिकारशक्ती वाढवणारी लस होती. ती कोरोनावरील लस नाही. कोरोनाची लस यायला जानेवारी महिना उजडू शकतो. मी आणि माझ्या स्टाफने ही रोगप्रतिकारकशक्ती वाढवणारी लस घेतली”, असल्याचा खुलासा पवार यांनी स्वतः केला. शरद पवारांच्या या खुलाश्यानंतर पत्रकार परिषदेत एकच हशा पिकला.

याच पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने विचारले की, तुम्ही लस घेतली असल्यामुळेच एवढे बिनधास्त फिरता का? त्यावर पवार म्हणाले की, “असे काही नाही. बऱ्याच लोकांचा गैरसमज आहे की पुनावाला माझे वर्गमित्र असल्यामुळे मला मागेच लस मिळाली. पण त्यात तथ्य नाही. माझ्याबाबत लोक काहीही कंड्या पिकवतात. कोरोनाची लस यायला आणखी काही काळ वाट पाहावी लागेल.”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -