घरताज्या घडामोडीWork is Worship; आरोग्य मंत्री राजेश टोपेंनी मानले जयंत पाटील यांचे आभार

Work is Worship; आरोग्य मंत्री राजेश टोपेंनी मानले जयंत पाटील यांचे आभार

Subscribe

करोना व्हायरसचा प्रादुर्भाव महाराष्ट्रात सर्वाधिक झालेला आहे. इतर राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आढळले आहेत. मात्र हा व्हायरस लोकांमध्ये पसरु नये, यासाठी राज्य सरकारच्यावतीने शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. या प्रयत्नामागे एक महत्त्वाचा चेहरा आहे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचा. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आपल्या पक्षातील या शिलेदाराचे कौतुक केले आहे. एका वृत्तवाहिनीवरील मुलाखतीचा अंश ट्विटरवर टाकत जंयत पाटील यांनी राजेश टोपे यांना शुभेच्छा दिल्या. तर त्या ट्विटला रिप्लाय देताना राजेश टोपेंनी Work is Worship असल्याचे म्हटले आहे.

- Advertisement -

जयंत पाटील आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते की, “कोरोनावर मात करण्यासाठी राज्यसरकारने कंबर कसली आहे. आरोग्यमंत्री या नात्याने राजेश टोपे अहोरात्र झटत आहेत. राज्यातील प्रत्येक माणसाच्या स्वास्थ्याची काळजी करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिलेदाराला सलाम. जनसेवेसाठी सदैव कार्यरत रहा या शुभेच्छा! संकट मोठं आहे, पण त्यावर मात करू.”

जयंत पाटील यांनी माध्यमांना पाठविलेल्या प्रतिक्रियेमध्ये म्हटले की, “कोणताही बडेजावपणा नाही. कोणतीही प्रसिद्धी नाही… अत्यंत संयमाने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या खांद्याला खांदा लावत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे कोरोना व्हायरस विरोधात फिल्डवर काम करत आहे. आरोग्यमंत्री या नात्याने राजेश टोपे अहोरात्र झटत आहेत. राज्यातील प्रत्येक माणसाच्या स्वास्थाची काळजी करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिलेदाराला सलाम… जनसेवेसाठी सदैव कार्यरत रहा. संकट मोठंय पण त्यावर मात करू”

- Advertisement -

यावर रिप्लाय देताना राजेश टोपेंनी शरद पवार, सुप्रिया सुळे, अजित पवार आणि जयंत पाटील यांचे आभार मानले. जयंत पाटील यांची कौतुकाची थाप मला दुप्पट काम करण्याची ऊर्जा देईल, असे सांगत Work is Worship याप्रमाणे कार्य करत राहणे हीच माझी पुजा असल्याचे टोपे म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -