घरमहाराष्ट्रसमाजकंटाकांना रोखण्यास सज्ज रहा!

समाजकंटाकांना रोखण्यास सज्ज रहा!

Subscribe

गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या पोलिसांना सूचना

राज्यात सध्या जातीय क्लेश निर्माण करण्याचे काम काही जण करत आहेत. त्यांच्याविरोधात कडक कारवाई करण्याच्या सूचना पोलिसांना दिलेल्या आहेत. कायदा आणि सुव्यवस्था टिकविण्याची जबाबदारी सरकारवर आहे. पण गेल्या काही दिवसांपासून राज्यात कायदा आणि सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न सुरू आहे. सरकार अशा समाजकंटकांविरोधात गंभीर आहे. आमची सरकारतर्फे विनंती आहे की, कायदा कुणीही हातात घेण्याचा प्रयत्न करू नये. संघर्ष वाढवू नका. तेढ निर्माण करू नका. अशा प्रकारची कृती कुणाकडूनही झाली तर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिला आहे.

दिलीप वळसे- पाटील यांनी बुधवारी वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांसोबत बैठक घेतली. या बैठकीला पोलीस महासंचालक रजनीश शेठ उपस्थित होते. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना वळसे-पाटील म्हणाले, मशिदींवरील भोंग्यांवरून राज्यातील वातावरण तापविण्याचा प्रयत्न सुरू आहे. राज्यात भोंग्यांचा मुद्दा हा काही नवीन नाही. यासंदर्भात २००५ मध्ये सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला आहे. त्यानंतर २०१५ आणि २०१७ साली काही शासन निर्णय निघाले. त्यात अशा प्रकारच्या लाऊड स्पीकरच्या परवानगीची पद्धत ठरवून दिली आहे, असे वळसे -पाटील म्हणाले.

- Advertisement -

पोलिसांची परवानगी घेऊनच लाऊडस्पीकर लावायला हवेत. ज्यांना तशी परवानगी नाही, त्यांना हे लाऊड स्पीकर लावता येणार नाही. जे लाऊड स्पीकर लावतील, त्यांनी सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या निर्णयाच्या आधारे आणि राज्य सरकारने काढलेल्या शासन आदेशानुसार लावावेत. सरकारने कुठला लाऊड स्पीकर काढायचा किंवा लावायचा याबाबत प्रश्न उद्भवत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

राज यांच्या सभेबाबत औरंगाबाद पोलीस निर्णय घेतील
राज ठाकरे यांनी औरंगाबाद येथे १ मे रोजी जाहीर सभा घेणार असल्याची घोषणा केली आहे. त्यांच्या सभेला परवानगी नाकारावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस, वंचित बहुजन आघाडीसह इतरांनी केली आहे. राज यांच्या सभेमुळे औरंगाबादमधील वातावरण अधिक तणावाचे होईल, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. यावर बोलताना वळसे-पाटील यांनी राज ठाकरे यांच्या सभेबाबत औरंगाबाद पोलीस स्थानिक परिस्थिती पाहून निर्णय घेतील, असे सांगितले.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -