घरमहाराष्ट्रParambir Singh Letter: गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, विरोधकांची जोरदार मागणी

Parambir Singh Letter: गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, विरोधकांची जोरदार मागणी

Subscribe

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि नवनियुक्त होमगार्ड प्रमुख परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. गृहमंत्र्यांनी दर महिना १०० कोटी रुपयांची मागणी केली असा दावा परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लिहिलेल्या पत्रात केला आहे. याच प्रकरणावरून ठाकरे सरकारविरुद्ध विरोधी पक्ष असा वाद रंगू लागला आहे. या प्रकरणातील संबंधित गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा घ्यावा यासाठी भाजपा सरकारवर दबाव टाकत आहेत. भाजपा नेते चंद्रकांत पाटील, नारायण राणे, किरीट सोमैया यांनी गृहमंत्र्यांवर कारवाई करत त्यांचा नाराजीनामा घेण्याची मागणी केली आहे. त्यामुळे ठाकरे सरकार समोरील अडचणीत वाढ झाली आहे. यात आता मनसे अध्यक्ष राजे ठाकरे यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेत अनिल देशमुखांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

अनिल देशमुखांचा राजीनामा घ्यावा आणि चौकशीही करावी- चंद्रकांत पाटील

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हंटले की, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोप अतिशय धक्कादायक निंदनीय आहे. शरद पवार यांच्या ५६ वर्षांच्या कारकिर्दीतमध्ये अनेक मंत्र्यांना राजीनामे द्यावे लागले आहेत. मग अनिल देशमुख यांनी पाठिशी का घातले जात आहे? मात्र, अनिल देशमुख यांचा राजीनामा घेतलाच पाहिजे, तसेच त्यांची चौकशीही झाली पाहिजे, अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केवी आहे. परमबीर सिंह यांचे आरोप खोटे असल्याचा दावा गृहमंत्री करत असतील तर त्याची चौकशी व्हावी. गेल्या वर्षभरापासून सरकारला हप्ते योग्य पद्धतीने पोहोचत होते. अंबानी स्फोटक प्रकरणात नीट चौकशी झाली नाही याचा साक्षात्कार गृहमंत्र्यांना इतक्या दिवसानंतर झाला का? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही गोष्ट माहिती नव्हती का? या गोष्टीची माहिती मुख्यमंत्र्यांना कल्पना नसेल तर कोरोनाला घाबरून गप्प बसलो होतो हे मान्य करावे. जर तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही राजीनामा द्यावा. असे चंद्रकांत पाटील यांना सांगितले.

- Advertisement -

सचिन वाझे वर्षावर राहत होते- नारायण राणे

नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. सचिन वाझेंना पोलीस खात्यात आम्ही आणलं नाही अनिल देशमुख आणि परमबीर सिंग म्हणतात. म्हणजेच वाझेंना पोलीस खात्यात मुख्यमंत्र्यांनी आणल्याचं स्पष्ट होते. सिंग यांचा रोख थेट मुख्यमंत्र्यांच्या दिशेने आहे. मुख्यमंत्र्यांसाठीच वाझे काम करत होते. त्यामुळे मुख्यमंत्रींच वाझेंचे गॉडफादर आहे. हिरेन यांना मारण्याचे पाप वाझेंनी केले असून सर्व माहिती मुख्यमंत्र्यांना देते होते. यामुळे गृहमंत्र्यांचा राजीनामा घ्या अथवा नको पण मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, सचिना वाझे कुठे राहायचे हे मुख्यमंत्र्यांना माहित होते. वाझे वर्षा निवासस्थानी आणि ओबेरॉय हॉटेलमध्ये राहायचे. यावेळी वर्षा बंगल्यावर राहून वाझे सर्व माहिती मुख्यमंत्र्यांना देत होते. असे गौप्यस्फोट राणे यांनी केला.

परमबीर सिंग चांगले अधिकारी आहेत, वाह रे ठाकरे सरकार- किरीट सोमैया

यावर बोलताना किरीट सोमैया म्हणाले की, अनिल देशमुख सांगतात “सचिन वाझे परमबीर सिंगचे जवळचे आहेत. तर सचिन वाझे, परमवीर सिंग मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे जवळचे आहेत. यावर परमबीर सिंग म्हणतात, अनिल देशमुखनी महिन्यात ₹१०० कोटी म्हणजे १५ महिन्यात १५०० कोटी जमा केले. सामना” संजय राऊत लिहितात परमबीर सिंग चांगले अधिकारी आहे. वाह रे ठाकरे सरकार. असे म्हणता सोमैय्या यांनी ठाकरे सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.

- Advertisement -

केंद्राने चौकशी केली तर फटाक्याची माळ लागेल- राज ठाकरे

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची सचिन वाझे प्रकरणी बदली करण्यात आली आहे. मात्र, जर सिंह यांचा वाझे यांच्याशी संबंध असेल तर परमबीर सिंह यांची बदली का केली. त्यांची चौकशी का केली नाही. त्यांचा जर या प्रकरणात संबंध असेल म्हणून सिंह यांना निलंबित करण्यात आले, असे बोले जात असेल तर त्यांची चौकशी का केली नाही. याबाबत सरकारने अद्याप उत्तर दिलेले नाही. याचा अर्थ आपल्या काही अंगाशी आलं का ते झटकून टाकने, असाच होतो, असे म्हणत राज ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्र सरकार यांवर चौकशी करून

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -