घरमहाराष्ट्रपांडवकालीन डोंगरावर शेकडो विद्यार्थ्यांनी राबवली स्वच्छता मोहीम

पांडवकालीन डोंगरावर शेकडो विद्यार्थ्यांनी राबवली स्वच्छता मोहीम

Subscribe

पिंपरी-चिंचवडच्या सेंट जोसेफ स्कूलमधील शेकडो विद्यार्थ्यांनी जुना पुणे-मुंबई महामार्गा लगत असलेल्या घोराडेश्वर डोंगरावर जाऊन स्वच्छता मोहीम राबवली. त्या ठिकाणी महाभारतातील पांडव यांनी एक दिवस आणि रात्र या डोंगरावर वास्तव्य केल्याची आख्यायिका आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच करावं तेवढं कौतुक नक्कीच कमी आहे. ते आपल्या जुन्या वास्तू जपत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरातील सेंट जोसेफ या शाळेतील शेकडो विद्यार्थ्यांनी पांडवकालीन घोरडेश्वर डोंगरावर स्वछता राबवली. दरम्यान, याच डोंगरावर महादेवाचे मंदिर आहे. त्यामुळे अनेक भाविक या ठिकाणी येतात. तसेच अनेक नागरिक, तरुण, तरुणी ट्रेकिंगसाठी येतात. त्यामुळे डोंगरावर प्लास्टिक आणि कागदाचा मोठा कचरा जमा होतो. या सर्व कचऱ्याची विद्यार्थ्यांनी साफसफाई केली आहे. पाण्याची टाकी, कागद, रिकाम्या प्लास्टिकच्या बाटल्या असा सर्व कचरा श्रमदान करून एका जागी जमा करून त्याला नष्ट करण्यात आले.

- Advertisement -

पाणी आडवा पाणी जिरवा, असा उपक्रम सरकारने अनेकदा राबवला त्याला काहीसा हातभार विद्यार्थींनी लावला, कारण दगडांचे बांध घालत विद्यार्थ्यांनी आदर्श घालून दिला. अभ्यासाचा एक भाग आणि मुलांना स्वछता विषयीची गोडी आणि माहिती मिळावी म्हणून हे पाऊल उचलले तसेच विद्यार्थ्यांना याचे गुणही मिळतात. शाळेचे शिक्षक आणि विद्यार्थी यांनी भाग घेतला, मुलांच्या या कार्याची प्रशंसा पंचक्रोशीत होऊ लागली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -