घरमहाराष्ट्र'राज्यात १६ कोटींची गुंतवणूक मी घरबसल्याच केली'; उद्धव ठाकरेंचा विरोधकांना टोला

‘राज्यात १६ कोटींची गुंतवणूक मी घरबसल्याच केली’; उद्धव ठाकरेंचा विरोधकांना टोला

Subscribe

राज्यांचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दै. सामनाला दिलेल्या मुलाखतीचा दुसरा भाग सोशल मीडियावर प्रसिद्ध झाला असून यामध्ये त्यांनी सुरूवातीलाच कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर देशात किंबहुना जगावर आलेल्या आर्थिक संकटाविषयी भाष्य केले. सामनाचे कार्यकारी संपादक आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ही मुलाखत घेतली आहे. राज्यामध्ये या बेरोजगारी आणि आर्थिक संकटाशी लढा देण्याकरता करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती त्यांनी या मुलाखतीत दिली. ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील सर्व मुख्यमंत्र्यांशी संवाद साधतात. त्यांनी एका व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये निर्देश दिले होते. की तुम्ही कोणत्या प्रकारच्या मोठ्या घोषणा करू नका, की ज्यामुळे केंद्र सरकार अडचणीत येईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात १६ हजार कोटींच्या गुंतवणूकीचे करार राज्याने केले आहेत. सगळ काही संपलं आहे, असे समजू नका. हा काळ आणीबाणीचा आहे. उद्योगधंदे हे पुन्हा सुरू होणार आहेत. तर काही भागांमध्ये ते सुरू देखील झाले आहेत. विशेषतः मुंबई, पुण्यामध्ये दाट लोकवस्तीचा पट्टा असल्यामुळे इथे लोकांना याचा जास्त प्रादुर्भाव जाणवला आहे. राज्याच्या दृष्टीने सांगायचे झाले तर अनिश्चितता नाही, आपण अनेक सोयी – सुविधा सर्वकाही गहाण टाकून करतोय असे नाही. सरकार सर्व नियमांमध्ये राहूनच उद्योगधंदे आणत आहे. मी स्वतः निराशावादी नाही आणि कोणाला होऊ देणार नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच धोरण निश्चित असेल तर कुठे राहून काम करता येते, मी ही राज्यातील १६ कोटींची गुंतवणूक घरबसल्याच केली. त्याकरता मला कुठेही बाहेर जावे लागले नाही, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना टोला लगावला.

- Advertisement -

दरम्यान, शिवसेनेचे उद्योगमंत्री असताना मागील सरकारमध्ये करार केल्यानंतरही गुंवणूक आली नाही याचे कारण असे की नुसता तुमचा उद्योगमंत्री असून चालत नाही. तुमचं सरकारही महत्वाची भूमिका बजावते. मगाशी तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे हे सर्व झाले तेव्हा नोटबंदी आली. धोरणांची अनिश्चितता असेल तर उद्योग येणार नाहीत, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

हेही वाचा –

आरोग्य-अर्थव्यवस्थेत तारतम्य ठेवावेच लागेल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -