घरमहाराष्ट्रBhavana Gawali : भावना गवळींना वाशिममधून उमेदवारी दिली तर...; विरोध करणारे पत्र...

Bhavana Gawali : भावना गवळींना वाशिममधून उमेदवारी दिली तर…; विरोध करणारे पत्र व्हायरल

Subscribe

वाशिम : लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या असल्या तरी महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जागा वाटपाचा फॉर्म्युला अद्यापही जाहीर करण्यात आलेले नाही. महायुतीतील शिवसेना शिंदे गट आज संध्याकाळपर्यंत जागावाटपाची यादी जाहीर करण्याची शक्यता आहे. मात्र त्याआधीच यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या खासदार भावना गवळी यांची लोकसभेची उमेदवारी धोक्यात आली आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहून भावना गवळी यांच्या उमेदवारीला विरोध करण्यात आला आहे. त्यामुळे आता शिवसेनेच्या यादीत भावना गवळी यांना उमेदवारी मिळणार का? हे पाहावे लागेल. (If Bhavana Gawali is nominated from Washim we will choose another option Letter of protest goes viral)

हेही वाचा – Kolhapur Constituency : उमेदवारीसाठी शिवसेना आणि भाजपामध्ये शह-काटशहाचे राजकारण

- Advertisement -

भावना गवळी यांना यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिल्यास त्यांना मतदार करणार नाही, अशा आशयाचे एक पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वाशिम मतदारसंघात भाजपा आहे. लव्ह जिहाद, गो हत्या, धर्मांतरण विरोधासाठी आम्ही आंदोलन करत असताना तुमचा लोकप्रतिनिधी या गोष्टीला बळी पडला आहे. तुम्ही बाईसाहेबांना उमेदवारी देऊ नका आणि दिली तर आम्ही पक्षनिष्ठ असलो तरी दुसरा पर्याय निवडू, असा इशारा पत्रातून देण्यात आला आहे. तसेच याठिकाणी लोकप्रतिनिधीच्या हप्तेवसुलीमुळे विकासकामे रखडली आहेत. त्यामुळे आमच्या भावनांचा अनादर केला तर आम्ही त्यांना मते देण्याची भावना ठेवणार नाही. या मतदार संघात भाजपाचा उमेदवार असल्यास उत्तम, पण आयात केलेला माल नसावा, अशी मागणी पत्रातून करण्यात आली आहे.

हेही वाचा – Maharashtra : राज्य सरकारची खैरात; भाजपा-अजित पवार गटाशी संबंधित साखर कारखान्यांना 1898 कोटींचे कर्ज

- Advertisement -

शिवसेनेच्या जागावाटपाची यादी आज संध्याकाळी?

ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरी शिवसेना लोकसभा गट नेते आणि खासदारांची जागावाटपासंदर्भात बैठक पार पडली. या बैठकीला राहुल शेवाळे, कृपाल तुमाने, भावना गवळी, धैर्यशिल माने, श्रीरंग बारणे, सदाशिव लोखंडे, हेमंत गोडसे उपस्थित होते. विशेष म्हणजे शिवसेनेच्या जागावाटपाची यादी आज संध्याकाळपर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -