घरमहाराष्ट्रजगनमोहन रेड्डींप्रमाणे अजित पवारही देणार स्थानिकांना नोकऱ्यांमध्ये ७५ टक्के आरक्षण

जगनमोहन रेड्डींप्रमाणे अजित पवारही देणार स्थानिकांना नोकऱ्यांमध्ये ७५ टक्के आरक्षण

Subscribe

विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचा विजय झाला तर सत्तेत आल्यावर नोकरीमध्ये स्थानिकांसाठी ७५ टक्के जागा आरक्षित करु, असे आश्वासन शरद पवार यांनी दिले आहे.

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी सोमवारी आंध्र प्रदेश विधानसभेत खासगी औद्योगिक प्रकल्प आणि कारखान्यांमध्ये स्थानिकांसाठी ७५ टक्के आरक्षण देण्याचा कायदा संमत केला आहे. जगनमोहन रेड्डींच्या या कायद्याचे पडसाद आता महाराष्ट्रातही पडताना दिसत आहेत. कारण महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या कायद्याशी संबंधित मोठे आश्वासन दिले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय झाला तर सत्तेत आल्यावर स्थानिकांसाठी ७५ टक्के आरक्षण लागू करु, असे अजित पवार म्हणाले आहेत. अजित पवार सध्या सोलापूर दौऱ्यावर आहेत. सोलापूरमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पवार घेत आहेत. या मुलाखतींनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्याचे प्रयत्न

लोकसभा निवडणुकांदरम्यान काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा वंचित बहुजन आघाडीला सोबत घेऊन लढण्याचा प्रयत्न फसला. त्यामुळे त्याचा मोठा फटका महाआघाडीला बसला. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला महाआघाडीत सामील करण्याचे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे प्रयत्न सुरु आहेत. त्यासंदर्भात अजित पवार यांनी पत्रकार परिषदेच माहिती दिली. याशिवाय ‘वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी आघाडीबाबत काहीही वक्तव्ये केली तरीही आम्ही ते दुखावतील असे उत्तर देणार नाही’, असेही अजित पवार म्हणाले.


हेही वाचा – “अजित पवार, मस्ती तुझीच जिरली” शिवाजीराव आढळरावांच पलटवार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -