घरदेश-विदेशकर्नाटक: बी. एस. येडियुरप्पा घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ

कर्नाटक: बी. एस. येडियुरप्पा घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ

Subscribe

कर्नाटक भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. एस. येडियुरप्पा आज संध्यकाळी ६ वाजता राजभवनात मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत.

काँग्रेस-जेडीसच्या आघाडी सरकारचा झालेल्या पराभवानंतर संपूर्ण जगाचे लक्ष आता कर्नाटक राज्यातील राजकीय घटनाक्रमाकडे लागले आहे. माजी मुख्यमंत्री आणि कर्नाटक भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. एस. येडियुरप्पा यांनी आज राज्यपाल वजुभाई वाला यांची राजभवनात भेट घेतली आणि सरकार स्थापनेचा दावा सादर केला. राज्यपाल वाला यांनी येडियुरप्पा यांनी सादर केलेला प्रस्ताव मान्य केला असून आज संध्यकाळी ६ वाजता राजभवनात शपथविधीचा कार्यक्रम होणार आहे. बी. एस. येडियुरप्पा यांना ३१ जुलै सभागृहात बहुमत सिद्ध करावयाचे आहे. २०१८ साली विधानसभा निवडणुकीतनंतर सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपने येडियुरप्पा यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन केली होती. मात्र बहुमत सिद्ध करू न शकल्यामुळे येडियुरप्पा काहीच दिवसात राजीनामा दिला होता.

कुमारस्वामींनी दिला राजीनामा

कुमारस्वामी त्यांच्या नेतृत्वातील काँग्रेस-जेडीएसची आघाडी सरकार कर्नाटक विधानसभेत बहुमत सिद्ध करू शकली नाही. काँग्रेस-जेडीएसच्या आघाडीला ९९ तर भाजपच्या पारड्यात १०५ मत आली. कर्नाटक विधानसभेत एकूण २२५ जागा आहेत. विधानसभेत बहुमत सिद्ध करू न शकल्यामुळे एच. डी. कुमारस्वामी यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा राज्यपाल वजुभाई वाला यांना सुपूर्त केला. गुरुवारी कर्नाटक भाजपच्या प्रतिनिधी मंडळाने केंद्रीय गृहमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि कार्यकारी अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांची आज भेट राजधानी दिल्लीत भेट घेतली आणि कर्नाटक राज्यातील राजकीय परिस्तिथीवर चर्चा केली.

- Advertisement -

हेही वाचा – भाजपकडून कर्नाटकात लोकशाहीची गळचेपी – बाळासाहेब थोरात

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -