घरमहाराष्ट्रपुणेकोरोनातून बरे झाल्यानंतर वास ओळखण्याची क्षमता बाधित; 80 टक्के लोकांना त्रास

कोरोनातून बरे झाल्यानंतर वास ओळखण्याची क्षमता बाधित; 80 टक्के लोकांना त्रास

Subscribe

पुणे : कोरोना संसर्गातून पूर्णपणे बरे झालेल्या जवळपास 80 टक्के लोकांची वास ओळखण्याची क्षमता बाधित झाल्याचे एका संशोधनातून पुढे आले आहे. पुण्यामधील विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेच्या डॉ. निक्सन अब्राहम यांनी यासंबंधीत केलेले संशोधन ‘करंट रिसर्च इन न्यूरोबायोलॉजी’ या आंतरराष्ट्रीय शोधपत्रिकेत प्रकाशित करण्यात आले आहेत.

डॉ. निक्सन यांनी कोरोना संसर्गातून बरे झालेल्या, परंतु वास घेण्याची क्षमता गमावलेल्या लोकांवर संशोधन करण्याचे ठरवले. त्यांच्या नेतृत्वात राजदीप भौमिक, मीनाक्षी परदासनी, सारंग महाजन, राहुल मगर, समीर व्ही. जोशी, गणेश नायर, अनिंद्य भट्टाचार्य यांनी हे संशोधन केले. यासाठी त्यांनी बी. जे. वैद्यकीय (ससून) महाविद्यालयाची मदत घेतली. संशोधकांनी कोरोनाची लक्षणे नसलेले, विषाणूचे वाहक असलेले, बरे झालेले आणि निरोगी व्यक्तींची निवड केली. संशोधनाच्या अचूक निदानासाठी या सर्वांची चार गटांत विभागणी केली.

- Advertisement -

संशोधकांनी प्रयोगशाळेत ‘अल्पोक्सोमीटर’ विकसित केले आणि कोरोना संसर्गातून बरे झालेल्या २०० रुग्णांची चाचणी केली. यावेळी त्यांनी बरे झालेल्या लोकांना वास घेण्यासाठी 10 प्रकारचे गंध दिले आणि त्यांच्या वास घेण्याच्या क्षमतेचे निरीक्षणे केले. यातून त्यांना असे समजले की, 80 टक्के रुग्णांच्या वास ओळखण्याच्या क्षमतेवर परिणाम झाला आहे, तर अनेक लोकांना वास ओळखता येत नाही आहे. लक्षणे असलेले रुग्ण आणि लक्षणे नसलेल्या रुग्णांच्या वास ओळखण्याच्या क्षमतेत फरक दिसून आले. त्यामुळे असे समजले की, कोरोनातून बरे झालेल्या रूग्णांची वास ओळखण्याची क्षमता प्रभावित झाली आहे. त्यामुळे संशोधकांनी विकसित केलेले ‘अल्पोक्सोमीटर’ अचूक असल्याचे सिद्ध झाले.

रुग्णांच्या न्यूरल सर्किटवर विपरीत परिणाम
कोरोना संसर्गानंतर रुग्णांच्या न्यूरल सर्किटवर विपरीत परिणाम दिसून आल्याचे डॉ. अब्राहम यांच्या संशोधनातून समोर आले आहे. न्यूरल सर्किट ही बाब मेंदूशी संबंधित आहे. जिथे आपल्याला वासाची जाणीव होते. कोरोनातून पूर्णपणे बरे झाल्यानंतर अनेकांमध्ये वास ओळखण्याची क्षमता पुन्हा आली आहे, परंतु असेही लोक आहेत की ज्यांना कोणत्याही प्रकारचा वास ओळखता येत नाही आहे.
डॉ. अब्राहम यांनी सांगितले की, आम्ही विकसित केलेल्या ऑल्फॅक्टोमीटरमुळे गंधाच्या संवेदनांचे इतके अचूक प्रमाणीकरण करणे शक्य झाले. यामुळे कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे घ्राणेंद्रीयाच्या संवेदी आणि संज्ञानात्मक दोन्ही कमतरतांबद्दल आम्हाला माहिती मिळू शकली. न्यूरोडीजनरेटिव्ह परिस्थिती आणि घ्राणेंद्रीयावर परिणाम करणाऱ्या संक्रमणांची तपासणी करण्यासाठी ही पद्धत आणखी विकसित करता येईल, असे ही डॉ. अब्राहम यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -