घरमहाराष्ट्रपिंपरी-चिंचवडमध्ये क्षुल्लक कारणावरुन टपरी चालकाला दगडाने मारहाण

पिंपरी-चिंचवडमध्ये क्षुल्लक कारणावरुन टपरी चालकाला दगडाने मारहाण

Subscribe

मुन्नालाल ननके प्रजापती वय-३८ यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी मोपेड दुचाकीवरून आलेल्या ३ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

सिगारेटचे पैसे मागितल्याच्या कारणावरून टपरी चालकाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. तिघांच्या टोळक्याने टपरी चालकाला दगडाने मारहाण केली. या घटनेमध्ये टपरी चालक गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास हिंजवडी पोलीस करत आहेत. मुन्नालाल ननके प्रजापती वय-३८ यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी मोपेड दुचाकीवरून आलेल्या ३ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

अशी घडली घटना

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मुन्नालाल यांची बावधन येथील जिजाई हॉटेल समोर पानटपरी आहे. रविवारी रात्री ९.३०च्या सुमारास मोपेड दुचाकीवरून तीनजण आले. त्यांनी मुन्नालाल यांच्याकडून सिगारेट घेतली. मुन्नालाल यांनी आरोपींकडे सिगारेटचे पैसे मागितले. यावरून आरोपींनी मुन्नालाल यांना हाताने व दगडाने मारहाण केली. यामध्ये मुन्नालाल यांच्या डोक्याला, खांद्यास व हाताला गंभीर दुखापत झाली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -