घरठाणेठाण्यात लोखंडी रेलिंगचा भाग कामगाराच्या अंगावर कोसळला, अग्निशमन दल पोहोचण्याआधीच...

ठाण्यात लोखंडी रेलिंगचा भाग कामगाराच्या अंगावर कोसळला, अग्निशमन दल पोहोचण्याआधीच…

Subscribe

Accident In Thane | १८ वर्षीय दीपक हा मूळचा छत्तीसगडच्या उमरकुली गाव येथील रहिवासी असून सध्या ठाण्यात रेतीबंदर येथे राहत आहे. तसेच तो अपघात घडला त्या ठिकाणी त्रिशदा कन्स्ट्रक्शन कंपनीचा कामगार आहे, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.

Accident In Thane | ठाणे – मुंबई-नाशिक महामार्ग येथे पूलाच्या कामासाठी उभारण्यात येणाऱ्या लोखंडी रेलिंगचा साचा एका तरुणाच्या अंगावर पडून तो जखमी झाला आहे. शुक्रवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास खारेगाव टोल नाक्याजवळ हा प्रकार घडला. वेळी तेथील कर्मचाऱ्यांनी खाजगी हायड्राच्या साह्याने पडलेली लोखंडी रेलिंग उचलून दीपकला बाहेर काढले तसेच तातडीने कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. दीपक ब्रिजिया (१८) असं या जखमी तरुणाचं नाव आहे.

हेही वाचा ठाण्यात खोदलेल्या खड्ड्यात पडून महिला जखमी

- Advertisement -

मुंबई-नाशिक महामार्गावर येथे पूलचे काम सुरू आहे. त्या कामासाठी उभारण्यात येणाऱ्या लोखंडी रेलिंगचा साचा अचानक काम करणारा दीपक याच्या अंगावर पडला. सुदैवाने त्यावेळी तेथे त्याच्यासोबत काम करणाऱ्या कामगारांनी तातडीने त्याच्या अंगावर पडलेला साचा बाजूला केला. या घटनेची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. पण ते पोहचण्यापूर्वीच दीपकला तातडीने कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथील डॉक्टरांनी कोणतीही मोठी दुखापत झाली नसून त्याच्या डाव्या पायाला व कमरेला किरकोळ दुखापत झाल्याचे म्हटले आहे. १८ वर्षीय दीपक हा मूळचा छत्तीसगडच्या उमरकुली गाव येथील रहिवासी असून सध्या ठाण्यात रेतीबंदर येथे राहत आहे. तसेच तो अपघात घडला त्या ठिकाणी त्रिशदा कन्स्ट्रक्शन कंपनीचा कामगार आहे, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.

महिला पडली खड्ड्यात

- Advertisement -

ठाण्यात रस्ता दुरुस्तीकरता खोदून ठेवलेल्या खड्ड्यात पडून एक महिला जखमी झाल्याची घटनाही गुरुवारी सायंकाळी घडली होती. कुमोदीनी रोशन फिरके (३८) असे या महिलेचे नाव असून, ही महिला किरकोळ जखमी झाली आहे. वागळे इस्टेट, रोड क्रमांक ३३ येथे हा अपघात घडला.

महिलेचा मृत्यू

मेट्रोच्या कामाकरिता खोदण्यात आलेल्या खड्ड्यामध्ये पिलरच्या सपोर्टसाठी लावण्यात आलेली लोखंडी प्लेट सुनिता बाबासाहेब कांबळे (३७) या महिलेच्या अंगावरती पडून महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास ठाण्यातील मुंबई नाशिक रोड जवळ, उत्सव हॉटेल समोरच्या बाजूला घडली. ती महिला भंगार गोळा करण्याचे काम करते अशी माहिती ठाणे महापालिका प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -