घरमहाराष्ट्रChitra Wagh : शेवटी घर सांभाळता न आलेल्यालाच..., चित्रा वाघ यांचा उद्धव...

Chitra Wagh : शेवटी घर सांभाळता न आलेल्यालाच…, चित्रा वाघ यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Subscribe

मुंबई : राज्यात आधीच दुष्काळी परिस्थिती असताना आता अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान केले आहे. मात्र याही परिस्थितीत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तेलंगणात प्रचारासाठी गेले आहेत. स्वतःचे घर न सांभाळू शकणारे शिंदे दुसऱ्याच्या घरात डोकावून पाहात असल्याची टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती. त्यावर भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी बोचरी टीका केली आहे.

हेही वाचा – तुमचा लोकांवर का विश्वास नाही? जाहिरातबाजीवरून सुभाष देशाईंची सरकारवर टीका

- Advertisement -

शिवसेना पक्षाचे प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यावर टीका केली. एक फूल दोन हाफपैकी एकजण तिकडे मध्य प्रदेशला गेले होते. दुसऱ्यांना डेंग्यू झाला होता. आता कुणीच कोठे दिसत नाहीत, असे सांगतानाच, महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा भागामध्ये अवकाळी पावसाने आणि गारपिटीने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. माझ्या प्राथमिक माहितीप्रमाणे उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा या भागांमध्ये जवळपास एक लाख हेक्टर शेतीचे नुकसान झालेले आहे. उत्तर महाराष्ट्रामध्ये तर गारपिटीने संपूर्ण द्राक्षाच्या बागा आणि कांद्याचे जे काही पीक होतं त्याचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालेले आहे, असे ते म्हणाले.

- Advertisement -

यावेळी खरिपातील कांद्याची लागवड थोडी उशिरा सुरू झाली होती. डिसेंबरला हा कांदा काढणीला आला असता, पण तोही गेला. एक तर गेल्या मोसमामध्ये केंद्राच्या नाठाळ विचित्र धोरणामुळे कांदा उत्पादक शेतकरी रडकुंडीला आला होता, आता पुन्हा त्यात अवकाळीने हल्ला केल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे, अशी टीका करतानाच ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. राज्यात दुष्काळी परिस्थितीबरोबरच अवकाळी पावसाचे संकट आलेले असताना असंवैधानिक असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तेलंगणात प्रचारासाठी गेले आहेत. स्वतःचे घर न सांभाळू शकणारे शिंदे दुसऱ्याच्या घरात डोकावून पाहात आहेत, असे ते म्हणाले.

हेही वाचा – Unseasonal rain : मुख्यमंत्री आणि बोगस महाशक्ती असलेले केंद्र सरकार कुठे आहे? ठाकरे गटाचा सवाल

यासंदर्भात भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर शरसंधान केले आहे. स्वत:बद्दलचे हे ज्ञान तुम्हाला कठोर आत्मपरीक्षणातून प्राप्त झालेले दिसते. याला अनुभवातून आलेले शहाणपण म्हणतात, असा टोला त्यांनी लगावला आहे. शेवटी घर सांभाळता न आलेल्यालाच त्याच्या तुटण्याचे दु:ख काय असते, त्याची जाणीव असते, असेही त्यांनी सुनावले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -