घरमहाराष्ट्रबीव्हीजीच्या विविध कंपनीवर आयकर विभागाची धाड

बीव्हीजीच्या विविध कंपनीवर आयकर विभागाची धाड

Subscribe

पिंपरी चिंचवड येथील बीव्हीजी कंपनीच्या कार्यालयावर प्राप्तिकर विभागाने छापा टाकला आहे. या कंपनीचे संस्थापक हणमंत गायकवाड आहे. दरम्यान या संदर्भात आत येण्यास पत्रकारांना मज्जाव करण्यात आला असून अद्याप छापा टाकण्याचे कारण अस्पष्ट आहे. आज, बुधवारी सकाळी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी बीव्हीजीवर अचानक छापा टाकला आहे. बीव्हीजीच्या पुणे, मुंबई आणि दिल्ली येथील कार्यालयावर देखील छापे टाकल्याचे सांगण्यात येत आहे.

आमचा व्यवसाय व्हाइट आहे. त्यामुळे घाबरण्याची गरज नाही. आयकर विभागाची धाड नव्हे चौकशी सुरू आहे. त्याला आम्ही सहकार्य करत आहोत. संबंधित कार्यालयाच्या चाव्या आणि कम्प्युटरचे पासवर्ड दिलेले आहेत. जे आहे ते उघड उघड आहे. मोठं होत असताना अनेक जणांना खुपत असत, पटत नसत. तसेच हितशत्रू वाढतात.
– हणमंत गायकवाड, संस्थापक, बीव्हीजी कंपनी

- Advertisement -

हाऊस किपींग आणि आरोग्य क्षेत्रातील नामांकित कंपनी म्हणून बीव्हीजीचा लौकिक आहे. राष्ट्रपती भवनासह देशभरातील अनेक शासकीय कार्यालयात तसेच खाजगी क्षेत्रातील कंपन्या व संस्थांमध्ये बीव्हीजी स्वच्छता सेवा पुरवत आहे. आज सकाळी पिंपरी-चिंचवड येथील बीव्हीजीच्या प्राप्तिकर विभागाच्या सुमारे ४० अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या पथकाने छापा टाकला. कार्यालयातील कोणत्याही कर्मचाऱ्याला बाहेर न सोडता सर्वांचे मोबाईल फोन काढून घेतले असून कार्यालयाचा इतर संपर्क देखील बंद करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

एक प्रतिक्रिया

  1. जसे हनुमंत गायकवाड वर कारवाई केली तसीच हनुमंत नाझीरकर वर कारवाई करा. हा एक मोठा frod मानून आहे.

टिप्पण्या बंद आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -