घरदेश-विदेश१००००००००० रेकॉर्ड ब्रेक लसीकरण

१००००००००० रेकॉर्ड ब्रेक लसीकरण

Subscribe

भारताने कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाचा १०० कोटींचा टप्पा ओलांडून नवा विक्रम रचला आहे. देशातील कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी १६ जानेवारी २०२१ पासून लसीकरणाला सुरुवात झाली. त्यानंतर लसीकरणावर अधिक भर देऊन ही मोहीम वेगाने राबवण्यात आली. 21 ऑक्टोबरला २७७ दिवसात भारताने ही ि वक्रमी कामगिरी केली आहे. या ऐतिहासिक दिनानिमित्ताने लाल किल्ल्यावर जगातील सर्वात मोठा ध्वज फडकवला जाणार आहे. तसेच देशातील या सुवर्ण कामगिरीमुळे ठिकठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. देशातील १०० ऐतिहासिक वास्तूंना तिरंग्याच्या रूपात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. याद्वारे सर्व आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर्स, वैज्ञानिका, लस उत्पादक यांचा सन्मान करून कोरोनामुळे मृत्यू झालेल्या लोकांना श्रद्धांजली वाहली जाणार आहे.

कोविन डॅशबोर्डच्या माहितीनुसार, आतापर्यंत १०० कोटी १५ हजार ७१४ जणांना लसीचे डोस देण्यात आले आहेत. यापैकी ७० कोटी ८३ लाख १८ हजार ७०३ जणांनी पहिला डोस घेतला असून २९ कोटी १६ लाख ९७ हजार ११ जणांनी दुसरा डोस घेतला आहे.

- Advertisement -

यानिमित्ताने केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार म्हणाल्या की, आजचा दिवस हा सर्व भारतवासीयांसाठी महत्त्वाचा आणि ऐतिहासिक क्षण आहे. भारताची ओळख आत्मनिर्भर असून लस तयार करून ९ महिन्यांत १०० कोटी लसीकरण पार करणारा देश ठरला आहे. मी सर्वांचेच आभार व्यक्त करते. यामध्ये डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, वैज्ञानिक या सर्वांनी खूप मेहनत केली आहे. प्रत्येक राज्यासोबत संवाद साधून अडचणीवर मात करत १०० कोटींचा लसीकरणाचा टप्पा पार करण्यात आला आहे. आज अभिमानाचा आणि गौरवाचा दिवस आहे.

लवकरच सर्वजण मिळून कोरोनाला हरवुयात- पंतप्रधान नरेंद्र मोदी

कोरोना महामारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी केल्या गेलेल्या कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाचा आकडा १०० कोटी पार गेला आहे. आज भारताने नवा विक्रम रचला असून हा ऐतिहासिक क्षण सर्व देशभरात साजरा केला जात आहे. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीच्या राम मनोहर लोहिया रुग्णालयात पोहोचले होते. यावेळीस केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया देखील उपस्थित होते. यानंतर त्यांनी हरयाणाच्या झज्जर येथील एम्स कॅम्पसमध्ये इन्फोसिस फाऊंडेशन सदन सुरू केले. यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना संबोधित केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आरोग्य कर्मचार्‍यांच्या कामाचे कौतुक करून आभार मानले.

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, ‘२१ ऑक्टोबर २०२१ या दिवसाची इतिहासात नोंद ठेवली जाईल. १०० कोटी डोस देऊन भारताने ऐतिहासिक कामिगिरी केली आहे. १०० वर्षात आलेली सर्वात मोठी महामारीसोबत लढण्यासाठी देशाकडे १०० कोटी डोसचे सुरक्षा कवच आहे. आता आपल्या सर्वजणांना एकत्र मिळून कोरोनाला हरवायाचे आहे.’ यानिमित्ताने मोदींनी प्रत्येक जिल्ह्यात मेडिकल कॉलेज बनवण्यावर जोर दिला आहे. तसेच कॅन्सरवरील जवळपास ४०० औषधांचे दर मोदी सरकारने कमी केल्याचे ते म्हणाले.

याशिवाय रुग्णांना डॉक्टरांकडे दाखवण्यात कोणतीही समस्या येऊ नये यासाठी मोदी सरकार लक्ष देत आहे. इन्फोसिस फाऊंडेशनचा उल्लेख करत मोदी म्हणाले की, ‘ही संस्था सेवाभावाने काम करत आहे. सेवेची कोणतीही संधी हातून जाऊ देऊ नये. तसेची ई-संजीवनीची सुविधा उपलब्ध आहे. याशिवाय या भागात अधिक काम केले जात आहे. समाजाच्या सामर्थ्याने आपण हे लक्ष्य लवकरच साध्य करू शकू.’

चीनमध्ये कोरोनाचा हाहाःकार, विमान फेर्‍या रद्द, शाळा बंद, जागोजागी मास टेस्टिंग सुरू

संपूर्ण जगाला कोरोना विषाणू संसर्गाच्या घाईत लोटणार्‍या चीनमध्ये नव्याने कोरोना विषाणू संसर्गाला सुरुवात झाली आहे. सलग पाच दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. कोरोनाचे नवे रुग्ण उत्तर आणि वायव्य प्रांतात आढळून आले आहेत. चीनमधील शेकडो विमान फेर्‍या रद्द करण्यात आल्या आहेत. शाळा देखील बंद करण्यात आल्या असून कोरोना चाचण्यांचा वेग वाढवण्यात आला आहे. देशाच्या विविध भागात प्रवास करणार्‍या वृद्ध प्रवाशांमध्ये कोरोनाचा नवा संसर्ग आढळून आला आहे. चीनच्या प्रशासनाने देशांतर्गत प्रांतांच्या सीमा बंद केल्या असून काही ठिकाणी लॉकडाऊन करण्यात आले आहे. चीनमधील उत्तरेतील लांझोऊ शहरातील 40 लाख नागरिकांना आवश्यक नसल्यास घराबाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -