घरमहाराष्ट्रशिवारातल्या शेळ्या मेंढ्या निघाल्या शारजाला 

शिवारातल्या शेळ्या मेंढ्या निघाल्या शारजाला 

Subscribe

तब्बल एक लाख शेळ्या आणि मेंढ्या येत्या काही दिवसात आखाती देशांमध्ये नागपुरातून शारजाला पाठवण्यात येणार आहेत. राज्यात पहिल्यांदाच नागपूरातून थेट शारजाला या शेळ्या मेंढ्या नेण्याचा प्रयोग होणार आहे. राज्यातील शेतकऱ्यांना अधिकाधिक फायदा व्हावा, हा या प्रयोगामागचा उद्देश आहे. गेल्या आठ महिन्यांमध्ये विविध मंत्रालयांमार्फत या पुढाकारासाठी बैठका घेण्यात आल्या होत्या. विदर्भ आणि नागपूर भागातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना याचा फायदा होईल, असा विश्वास नागपूरचे राज्यसभा खासदार डॉ. संतोष महात्मे यांनी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेच्यावेळी केला.

निर्यात होण्यापूर्वी जनावरांची आरोग्य तपासणी

केंद्रीय उद्योग आणि वाणिज्यिक मंत्रालय, मिहान, एअर इंडिया आणि केंद्रीय कृषी मंत्रालय यांच्या माध्यमातून हा प्रयोग साकारण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात तीन महिन्यांमध्ये १ लाख शेळ्या आणि ४६ हजार मेंढ्या शारजाला पाठवण्यात येणार आहेत. कृषी विभागाकडून शेळी, मेंढ्यांची चाचणी करण्यात येईल. या चाचणी दरम्यान रक्त तपासणी तसेच शेळी, मेंढ्याच आरोग्य याची तपासणी करण्यात येईल. एक्सपोर्ट करणाऱ्या कंपन्यांची जबाबदारी ही विमानसेवा वापरून त्यांनी आखाती देशांमध्ये पाठवण्याची असेल. मागणी आणि पुरवठा यानुसार ग्राहकांना फायदा मिळणार आहे. येत्या दिवसांमध्ये संपुर्ण महाराष्ट्रातून शेळ्या मेंढ्याचा शोध घेण्यात येणार आहे. हे प्रायोगिक तत्वावर चालणारे मॉडेल असून या प्रकल्पाच्या यशानंतर संपुर्ण राज्यभर हा प्रयोग राबवण्यात येईल.

- Advertisement -

आतापर्यंत अशा प्रकारची सुविधा कोणत्याही विमानतळावर नव्हती. शेळ्या मेंढ्याचा संपुर्ण वाहतूक खर्च हा कंत्राटदाराचा असेल. शेतीला जोडूनच शेळी आणि मेंढी पालन हा एक पूरक व्यवसायधंदा म्हणून केला जाणे अपेक्षित आहे. आखाती देशात आगामी महिन्यात मागणी वाढल्याने शेतकऱ्यांना चांगला मोबदला मिळेल असा विश्वास महात्मे यांनी व्यक्त केला.

भारतातून निकृष्ट जनावरांची निर्यात

नाशिकच्या ओझर विमानतळावरुन गेल्या काही दिवसांपासून निकृष्ट शेळ्या – मेंढ्यांची निर्यात होत असल्याची बाबा खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी निदर्शनास आणली होती. शेळ्या-मेंढ्यांची आरोग्य तपासणी न होता निर्यात होत असल्यामुळे परदेशात गेल्यानंतर जनावरांच्या तपासणीत जर काही आजार आढळला तर संपुर्ण भारतातीलच निर्यात बंद होऊ शकते, अशी भीती चव्हाण यांनी व्यक्त केली होती. पशुसंवर्धन खात्याच्या सहसंचालकांना पत्र लिहून याबाबत कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -