घरमहाराष्ट्रINS Vikrant Fund Scam : किरीट सोमय्या हाजीर हो! विक्रांत फंड घोटाळा...

INS Vikrant Fund Scam : किरीट सोमय्या हाजीर हो! विक्रांत फंड घोटाळा प्रकरणी पोलिसांनी पाठवली नोटीस

Subscribe

भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांना आयएनएस विक्रांत फंड घोटाळा प्रकरणी मुंबई पोलिसांनी नोटीस पाठवली आहे. किरीट सोमय्या यांच्यासह त्यांचा पुत्र नील सोमय्या यांना देखील नोटीस पाठवली आहे. शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी सोमय्या यांच्यावर भ्रष्टाचार केल्याचे आरोप केले होते. या आरोपानंतर माजी सैनिक बबन भोसले यांनी बुधवारी उशिरा रात्री ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.

दरम्यान, या प्रकरणाची चौकशी करण्याकरिता पोलिसांनी किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांना नोटीस पाठवली आहे. उद्या शनिवारी सकाळी ११ वाजता ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश पोलिसांनी दिले आहेत. सोमय्यांविरोधात कलम ४२०, ४०६, ३४ अंतर्गत पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे उद्या किरीट सोमय्या आणि नील सोमय्या चौकशीला जातात का हे पाहावं लागेल.

- Advertisement -

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणाला वाचा फोडली होती. भाजपने आयएनएस विक्रांत वाचवण्यासाठी मोहिम राबवली होती. लोकांकडून पैसे गोळा केले जात होते. हे पैसे राजभवनात जमा करणार असल्याचं तेव्हा सोमय्या यांनी सांगितलं होतं. मात्र, किरीट सोमय्या यांनी हे पैसे राजभवनात जमा केले नाहीत, असं राजभवनाने सांगितल्याचं राऊत म्हणाले. याबाबत त्यांनी काही कागदपत्रे दाखवली. यामध्ये राऊत यांनी ५७ कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप केला. दरम्यान, आज त्यांनी सोमय्या यांचं जूनं ट्विट शेअर केलं आहे. ज्यामध्ये सोमय्या १४० कोटी राजभवानाला देणार असल्याचं म्हटलं आहे.

दरम्यान, संजय राऊत यांनी केलेल्या आरोपानंतर माजी सैनिक बबन भोसले यांनी बुधवारी उशिरा रात्री ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीनंतर ट्रॉम्बे पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेतला. सोमय्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -