घरमहाराष्ट्रInternational Womens Day : संस्कृतीच्या वाहक तुम्हीच, सांगत राज ठाकरेंनी महिलांना केले...

International Womens Day : संस्कृतीच्या वाहक तुम्हीच, सांगत राज ठाकरेंनी महिलांना केले आवाहन…

Subscribe

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महिला दिनाच्या शुभेच्छा देत त्यांच्या ट्विटर अकाउंटला पोस्ट केली आहे. या पोस्टमधून त्यांनी महिलांना महाराष्ट्राची संस्कृती जोपासण्याचे आवाहन केले आहे.

मुंबई : जागतिक महिला दिनानिमित्त सगळ्यांकडूनच महिलांना शुभेच्छा देण्यात येत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे हे देखील शुभेच्छा देण्यासाठी आणि आपले मत व्यक्त करण्यासाठी सोशल मीडियाचा सर्वाधिक वापर करताना पाहायला मिळतात. राज ठाकरे यांनी X या सोशल मीडिया साइटवरील त्यांच्या अधिकृत अकाउंटवरून सर्व महिलांना शुभेच्छा दिल्या आहेत. परंतु, या शुभेच्छांसोबतच त्यांनी महिवांना महत्त्वाचे आवाहन देखील केले आहे. महिला या संस्कृतीच्या वाहक असतात, त्यामुळे महिलांनी भारतीय संस्कृती जपली पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी महिलावर्गाकडे व्यक्त केली आहे. (International Womens Day: You are carriers of culture, Raj Thackeray appeals to women)

हेही वाचा… Womens Day : राज्याचे चौथे महिला धोरण आजपासून होणार लागू; वाचा काय आहे वैशिष्ट्य?

- Advertisement -

राज ठाकरे यांनी X वर शेअर केलेल्या पोस्टमधून महिला वर्गाला महत्त्वाचे आवाहन केले. महिलांनी महाराष्ट्राची भाषा, खाद्य संस्कृती, लोकगीते, महाराष्ट्राची गाणी, ओव्या, लोकगीते आणि लोककथा ही संस्कृती जपली पाहिजे. कारण संस्कृती, परंपरा पुढे चालू ठेवण्यासाठी महिला कायमच महत्त्वाची भूमिका बजावत असतात. ज्यामुळे राज ठाकरे यांनी त्यांची ही अपेक्षा महिला वर्गाकडे व्यक्त करून दाखवली आहे. तर या पोस्टसोबतच त्यांनी एक व्हिडीओ देखील पोस्ट केला आहे. या व्हिडीओमधून त्यांनी ‘तुला फक्त तू जन्म देतेस येथे, तुझ्यावाचुनी वांझ पुरुषार्थ हा…’ असे म्हणत महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

काय आहे राज ठाकरेंची पोस्ट?

“आज जागतिक महिला दिन, त्याबद्दल तमाम माता-भगिनींना मनःपूर्वक शुभेच्छा. आजच्या दिवशी महाराष्ट्रातील तमाम माता-भगिनींना माझी विनंती आहे म्हणा किंवा तुमच्याकडून माझ्या काही अपेक्षा आहेत म्हणा. कुठल्याही संस्कृतीच्या वाहक ह्या महिलाच असतात. जेव्हा आपण संस्कृती म्हणतो त्यात भाषा येते, खाद्यपरंपरा येते, लोकगीतं येतात, विविध परंपरा येतात, मान्यता येतात, ह्या सगळ्या गोष्टी पिढ्यानपिढ्या पुढे जातात, त्या स्त्रियांमुळेच.” असे म्हणत त्यांनी महिलांना संस्कृतीचे वाहक म्हटले आहे.

- Advertisement -

तर, “आज जगभर ब्रँड संस्कृतीच्या आड, आणि एकजिनसीपणाच्या नावाखाली स्थानिक संस्कृतीच नष्ट करायला सुरुवात झाली आहे. हे आपल्यासारख्या समृद्ध संस्कृतींना घातक ठरू शकतं. म्हणून आपली खाद्यपरंपरा असेल, म्हणी असतील, गाणी असतील, ओव्या असतील, लोकगीतं असतील, लोककथा असतील सगळं लिखित किंवा आता व्हिडीओजच्या स्वरूपात जतन करून ठेवा. कारण मी म्हणलं तसं संस्कृतीच्या वाहक तुम्हीच असता. ह्याचा अर्थ तुम्ही फक्त पारंपरिक गोष्टींमध्ये अडकून पडा असं अजिबात नाही. आज तुम्ही जगाला गवसणी घालतच आहात, ते प्रशंसनीयच आहे. पण जुन्या नव्याचा संगम हा स्त्रियाच साध्य करू शकतात हे नक्की. तुम्हाला पुन्हा एकदा जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा !” असे लिहित त्यांनी महिलांना महाराष्ट्राची संस्कृती जपण्याचे आवाहन केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -