घरमहाराष्ट्रमीरा बोरवणकरांनी केलेल्या आरोपांची न्यायमूर्तींमार्फत चौकशी करा; नाना पटोलेंची मागणी

मीरा बोरवणकरांनी केलेल्या आरोपांची न्यायमूर्तींमार्फत चौकशी करा; नाना पटोलेंची मागणी

Subscribe

मुंबई : माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांनी केलेल्या या गंभीर आरोपांची उच्च न्यायालयाचे विद्यमान न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्यामार्फत चौकशी करावी आणि चौकशी होईपर्यंत अजित पवार यांना कार्यमुक्त करावे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

नाना पटोले म्हणाले, “मीरा बोरवणकर यांनी पुण्यातील येरवड्याच्या सरकारी जागेसंदर्भात केलेले आरोप अत्यंत गंभीर आहेत. अजित पवार यांनी सरकारी जागा खासगी बिल्डरच्या घशात घालण्याचा प्रयत्न केला व त्यासाठी आपल्यावर दबाव आणला होता, असा गंभीर आरोप बोरवणकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन केला आहे. मीरा बोरवणकर यांनी केलेल्या या गंभीर आरोपांची उच्च न्यायालयाचे विद्यमान न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्यामार्फत चौकशी करावी आणि चौकशी होईपर्यंत अजित पवार यांना कार्यमुक्त करावे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – अजित पवार गटाला मीरा बोरवणकरांचे थेट आव्हान, म्हणाल्या – ‘अब्रूनुकसानीचा दावा करावा.’

नाना पटोले पुढे म्हणाले की, “मीरा बोरवणकर यांनी येरवड्याची पोलीस विभागाची जागा बिल्डरच्या घशात घालण्याचा तत्कालीन पालकमंत्र्यांचा प्रयत्न होता हा जो आरोप केला आहे, त्यावर सरकारला आम्ही अधिवेशनात जाब विचारणाच आहेत. पण चौकशी करा अशी मागणी केली तर सरकारच सरकारची चौकशी कशी करणार? या प्रकरणात ‘दाल में कुछ काला है’, असे नाहीतर सर्व डाळच काळी आहे. अजित पवार यांनी त्यांच्या जवळचा बिल्डर शाहीद बलवा याला सरकारी जमीन द्यावी म्हणून आपल्यावर कसा दबाव आणला हे बोरवणकर यांनी पुस्तकात लिहिले होतेच पण आज पत्रकार परिषद घेऊन त्यावर शिक्कामोर्तब करत गंभीर आरोप केले आहेत. सरकारमध्ये जर काही नैतिकता शिल्लक असेल तर त्यांनी उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायमूर्तीमार्फतच या प्रकरणी चौकशी केली पाहिजे तरच सर्व सत्य बाहेर येईल”, असेही पटोले म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – Meera Borwankar : अजित पवारांच्या अडचणी वाढणार? मीरा बोरवणकरांचे पत्रकार परिषदेतून थेट आरोप

काय लिहिले आहे पुस्तकात?

माजी आयपीएस अधिकारी असलेल्या मीरा बोरवणकर यांच्या ‘मॅडम कमिशनर’ पुस्तकांत लिहिण्यात आले आहे की, पुण्याच्या पोलीस आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर मी वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना भेटले. तसेच आसपासच्या पोलीस ठाण्यातील गुन्ह्याचा आढावा घेतला. एक दिवस विभागीय आयुक्तांचा फोन आला. त्यांनी म्हटलं की पुण्याचे पालकमंत्री तुमच्या बद्दल विचारत आहेत. त्यांना तुम्ही एकदा भेटा, येरवाडा पोलीस स्टेशनच्या जमिनीसंदर्भातील विषय असल्याचं त्यांनी मला सांगितलं. विभागीय कार्यालयात मी पालकमंत्र्याची भेट घेतली. पालकमंत्र्यांकडे येरवडा पोलीस स्टेशन परिसराचा नकाशा होता. त्यांनी सांगितलं की या जमिनीला लिलाव झाला आहे. जो जास्त बोली लावेल त्याच्यासोबत जमीन हस्तांरणाची प्रक्रिया पार पाडावी, मी पालक मंत्र्यांना सांगितलं की येरवडा पुण्यातील मध्यवर्ती ठिकाणी आहे. भविष्यात मोक्याच्या ठिकाणी जागा मिळणार नाही, असे स्पष्टपणे या पुस्तकांत लिहिण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -