घरनवी मुंबईकोकण आयुक्तांकडून ‘नमो ११ सूत्री’ चा आढावा

कोकण आयुक्तांकडून ‘नमो ११ सूत्री’ चा आढावा

Subscribe

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ७३ व्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम

नवी मुंबई-:
कोकण विभागात ‘नमो ११ सूत्री’ कार्यक्रम राबविण्यासाठी सर्व जिल्हाधिकार्‍यांनी संबंधित विभागाशी समन्वय साधून हा कार्यक्रम यशस्वी करावा, अशा सूचना कोकण विभागीय आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर (kokan Commissioner) यांनी दिल्या. विभागीय कार्यालयाच्या बैठक कक्षात झालेल्या ‘नमो ११ सूत्री’ कार्यक्रमा संबंधित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी ठाणे जिल्हाधिकारी ठाणे अशोक शिनगारे, पालघर जिल्हाधिकारी गोविंद बोडके, रायगड जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे, रत्नागिरी जिल्हाधिकारी एम.देवेद्र सिंह, उपायुक्त (महसूल) विवेक गायकवाड, तहसीलदार माधुरी डोंगरे उपस्थित होते.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ७३ व्या वाढदिवसानिमित्त ‘नमो ११ सूत्री’ कार्यक्रम जाहिर करण्यात आला आहे. या कार्यक्रमात महिलांना शासकीय योजनेचा लाभ देणे, नमो कामगार कल्याण अभियान,नमो शेततळी अभियान, नमो आत्मनिर्भर आणि सौर ऊर्जा गाव अभियान, नमो ग्रामसचिवालये अभियान, नमो आदिवासी स्मार्ट शाळा अभियान, नमो दिव्यांग शक्ती अभियान, नमो क्रीडा मैदान व उद्यान अभियान, नमो शहर सौंदर्य करणे अभियान, नमो तिर्थस्थळे व गडकिल्ले संरक्षण कार्यक्रम आणि नमो गरीब व मागासवर्गीय सन्मान अभियान राबविण्यात येणार आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी अन्य विभागांशी समन्वय साधून काम करावे अशा सूचना आयुक्त डॉ.कल्याणकर यांनी यावेळी दिल्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -