घरमहाराष्ट्रअॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करणाऱ्यांना फोडून काढते - आयपीएस नवटके

अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करणाऱ्यांना फोडून काढते – आयपीएस नवटके

Subscribe

मराठी आहात म्हणून पाठीवर मारत आहे. जर एखादी व्यक्ती अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यासाठी आली तर दलितांना मी फोडून काढते. असे बेताल वक्तव्य बीडमधील आयपीएस महिला अधिकाऱ्याने केले असल्याचे एका व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे.

अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यासाठी येणाऱ्या दलितांना मी फोडून काढले आहे. २१ जण अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यासाठी आले होते त्यांना मी बेदम मारहाण केली आहे. तसेच अॅट्रोसिटी दाखल करण्यासाठी जे येतात त्यांना मी जास्त चोप देते असे धक्कादायक वक्तव्य बीड मधील माजलगावच्या एका आयपीएस महिला अधिकाऱ्याने केले आहे. डीवायएसपी भाग्यश्री नवटके असं या महिला पोलीस अधिकाऱ्याचे नाव असून त्यांच्या या बेताल वक्तव्याची एक व्हिडिओ क्लिप सध्या प्रचंड व्हायरल झाली असल्याचे समोर आले आहे.

मराठा आहात म्हणून पाठीवर मारते

माजलगावच्या आयपीएस महिला अधिकारी भाग्यश्री नवटके यांनी केलेल्या या बेताल वक्तव्याप्रकरणी भाग्यश्री नवटके या अधिकाऱ्यावर सर्व स्तरातून टीकेची झोड उठवली आहे. नवटके यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये आयपीएस महिला अधिकारी भाग्यश्री नवटके म्हणत आहे की, मराठा आहात म्हणून पाठीवर मारत आहे. जर दलित असता तर मी त्यांना फोडून काढले असते. एका उच्च जातीच्या तरुणावर अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. अटक करण्याऐवजी मी त्याला कशी मदत केली आणि दलितांना कसा धडा शिकवला, असे बेतालपणे बोलत असल्याचे त्या व्हायरल झालेल्या व्हिडिओ क्लिपमध्ये दिसत आहेत. या व्हिडिओतून नवटके यांच्या विरोधात बहुजन विकास मोर्चाचे अध्यक्ष बाबुराव पोटभरे यांनी नवटके यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. तसेच त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला नाही तर आपण कोर्टात जाऊ असा इशारा पोटभरे यांनी दिला आहे. तसेच भाग्यश्री नवटके यांच्यावर अॅट्रोसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन त्यांना पोलीस सेवेतून बडतर्फ करपण्याची मागणी पोटभरे यांनी पोलीस महासंचालकांकडे केली आहे.

- Advertisement -

वाचा – अॅट्रोसिटीचा निकाल लावण्यासाठी सहा विशेष न्यायालयांची स्थापना


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -