घरमहाराष्ट्रपर्यावरण अभ्यासक बिश्वरूप राहा यांचे निधन

पर्यावरण अभ्यासक बिश्वरूप राहा यांचे निधन

Subscribe

नाशिकच्या बोरगड निसर्गसौंदर्याचे निर्माते पर्यावरण अभ्यासक बिश्वरूप राहा यांचे आज निधन झाले. ते ६२ वर्षांचे होते. त्यांच्यावर मुंबईतील नानावटी आणि हिंदुजा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते.

नाशिकच्या बोरगड निसर्गसौंदर्याचे निर्माते पर्यावरण अभ्यासक बिश्वरूप राहा यांचे आज निधन झाले. ते ६२ वर्षांचे होते. ऑगस्ट महिन्यात त्यांना अर्धांग वायूचा धक्का बसला होता. तेव्हापासून त्यांच्यावर मुंबईतील नानावटी आणि हिंदुजा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. अखेर त्यांची तीन महिन्यांची झुंज अयशस्वी ठरली; आज पहाटेच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. नाशिकतील पर्यावरण, वन्यजीवांचा सखोल अभ्यास राहा यांनी केला होता. त्यांनी बोरगड क्षेत्राच्या विकास योगदान दिले आहे. गंगापूर धरणाच्या परिसरात येणारे पक्षी असो, की शहर परिसरातील वनसंरक्षण याबाबत त्यांचे मोलाचे मार्गदर्शन असायचे. नाशिक जिल्ह्यामध्ये पेठ, सुरगाणा, कळवण, त्र्यंबकेश्वर या आदिवासी भागात वनक्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. हे वनक्षेविण्यासाठी आणि त्यात वाढ करण्यासाठी त्यांनी परिश्रम घेतले.

निसर्ग हिरवागार करण्याचा प्रयत्न

नाशिक शहरालगत असलेल्या बोरगड हिल स्टेशनला हिरवी शाल पांघरण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. परिसरातील आदिवासी जंगलतोड करत असे, त्यांना झाडांचे महत्व पटवून सांगत वेगवेगळ्या फळझाडांची लागवड याठिकाणी केली. त्याची जबाबदारी या आदिवासिंकडे सोपवली. तिथून त्यांना मिळणाऱ्या फळातून त्यांचा उदरनिर्वाह होऊ लागला. वर्षातील तीनही ऋतूत बोरगड हिरवेगार राहण्यासाठी प्रयत्न झाले. हे प्रयत्न यशस्वी झाले आणि इथे पर्यटकांची वर्दळ होऊ लागली. यातून अनेक आदिवासींना रोजगार उपलब्ध झाला, त्यानंतर त्यांचे निसर्गाप्रती प्रेम वाढत गेलेपुढे ते स्वतःच निसर्गाची काळजी त्यांनी घेतली.

- Advertisement -

उत्तम चित्रकार

ते एक चित्रकारदेखील होते. जिथे गेले तिथून ते दुर्मिळ पक्ष्यांचे व निसर्गसंपत्तीचे फोटो आपल्या कॅमेऱ्यात कैद करत असायचे. नाशिक गिरणारे रस्त्यावर गंगापूर धरणाच्या नजीक असलेल्या त्यांच्या घरी विविध पक्षांची माहिती देण्यासाठी प्रदर्शनच लावले होते. पक्षांची माहिती घेण्यासाठी आलेल्या प्रत्येकालाच जंगलात जाताना घ्यावयाची काळजी, पक्षांची संख्या कशी वाढेल याबाबत ते सांगत असत. नेचर कॉन्झरवेशन सोसायटी स्थापन करून वन विभागाच्या माध्यमातून निसर्ग संपत्तीचे रक्षण करण्यासाठी ते प्रयत्न करत असत. नाशिकच्या पर्यावरण क्षेत्राचा सखोल अभ्यास असलेला एक अभ्यासू व्यक्तीमत्व आज काळाच्या पडद्याआड गेल्याने सर्वत्र दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -