घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रश्री जगन्नाथ भगवानच्या जयघोषात नाशिकमध्ये प्रथमच साजरा झाला जगन्नाथ रथोत्सव

श्री जगन्नाथ भगवानच्या जयघोषात नाशिकमध्ये प्रथमच साजरा झाला जगन्नाथ रथोत्सव

Subscribe

नाशिक : देशभरात साजर्‍या केल्या जाणार्‍या जगन्नाथ पुरी यात्रेला प्रारंभ झाला असून, शहरात जगन्नाथ रथयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. पंचवटी परिसरातून या रथयात्रेला मंगळवारी (दि.२०) सुरुवात करण्यात आली. यंदा प्रथमच जगन्नाथ रथयात्रेचे आयोजन पंचमुखी हनुमान मंदिराचे महंत भक्तिचरणदास यांच्यासह रथयात्रा उत्सव समितीने केले.

सकाळी १० वाजता जगन्नाथ रथयात्रेला शहरातील पंचमुखी हनुमान मंदिरापासून सुरुवात करण्यात आली. पंचमुखी हनुमान मंदिराचे महंत भक्तिचरणदास तसेच रथयात्रा उत्सव समितीच्या वतीने सकाळी ८ वाजेच्या सुमारास भगवान श्रींची पूजा, आरती, शृंगार व भोग नैवेद्य दाखवण्यात आला. यावेळी रथात भगवान श्री जगन्नाथ, बहीण सुभद्रा व बंधू बलभद्र यांच्या मूर्ती विराजमान करण्यात आलेल्या होत्या. जगन्नाथपुरी येथे अशी मान्यता आहे कि, रथयात्रेत सामील होऊन जो कोणी रथ ओढतात त्यांना यज्ञ केल्याचे पुण्य प्राप्त होते. तसेच, जे दर्शन घेतात त्यांचे सर्व इच्छा पूर्ण होतात. त्यामुळे शहरातील विविध धार्मिक, सामाजिक संस्था, मंडळे यांनी रथ ओढण्यासाठी पुढाकार घेतला. ठिकठिकाणी या रथाचे स्वागत करण्यात आले. शहरातील विविध मान्यवरांनी रथातील भगवंतांची मनोभावे पूजा आरती केली. शहरात प्रथमच असा सोहळा साजरा होत असल्याने भक्तांची मोठी गर्दी दिसून आली.

- Advertisement -

यावेळी पंचमुखी हनुमान मंदिराचे महंत भक्तीचरणदास महाराज, दिगंबर आखाड्याचे महंत रामकिशोरदास महाराज, इस्कॉनचे गोपाल आनंद, महंत स्वामी रामतीर्थ महाराज, बटुक हनुमान मंदिराचे महंत बालकदास महाराज, महंत संतोकदास महाराज, नरसिंग प्रभू, महंत सदानंद महाराज, अच्युत प्राणदास महाराज, आमदार राहुल ढिकले, माजी महापौर दशरथ पाटील, विनायक पांडे, धनंजय बेळे, मामा राजवाडे, सचिन डोंगरे, भगवंत पाठक, महंत सुधीरदास, रामसिंग बावरी, गजू घोडके, हर्षद बेळे, सागर कापसे, अक्षय कलंत्री आदींसह मोठ्या प्रमाणावर साधू, महंत, सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले होते. संपूर्ण रथयात्रा मार्गावर पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला असून कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी घेण्यात आली होती. पोलिसानं बरोबरच, जिल्हाधिकारी, महावितरण व नाशिक महापालिकेच्यावतीने देखील सर्व खबरदारीचे उपाय योजना केल्या होत्या.

या मार्गाने गेली रथयात्रा 

रथयात्रा काट्या मारुती चौक, गणेशवाडी देवी चौक, मुंजोबा चौक, आयुर्वेदिक दवाखाना, गाडगे महाराज पूल, दिल्ली दरवाजा, नेहरू चौक घुमाळ पॉईंट, मेनरोड, रविवार कारंजा, होळकर पुल, मालेगाव स्टॅण्ड, पंचवटी कारंजा, मालविय चौक, शिवाजी चौक, काळाराम मंदिर पूर्व व उत्तर दरवाजासमोरून, ढिकले बंगला, नाग चौक, लक्ष्मण झूला पुल, काट्या मारुती चौक, पंचमुखी हनुमान मंदिरापर्यंत या मार्गाने काढण्यात आली.

- Advertisement -

रथयात्रेत विविध आकर्षण

यावेळी रथयात्रेत ब्रम्हा, विष्णू, महेश यांच्यासह विविध देवीदेवतांचे वेशभूषा करत नागरिक सहभागी झाले होते. त्यामुळे रथयात्रा बघण्यासाठी आलेले भाविक या वेशभूषा केलेल्यांसोबत सेल्फी घेत होते. तर यात सहभागी झालेले लहान मुल-मुली मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिक दाखवत असल्याने भाविकांचे लक्ष वेधले जात होते.

ओडीसाचे विशेष वाद्य

रथयात्रेच्या मिरवणुकीत स्थानिक वाद्यसह विविध प्रकारचे वाद्य वाजवणारे सहभागी झालेले होते. जगन्नाथ पुरीच्या यात्रेत वाजणार्‍या ओडिसा येथील चालीचे वाद्य या मिरवणुकीत वाजत असल्याने त्याचे भाविकांना विशेष आकर्षण होते. इस्कॉन मंदिरातील वाद्यदेखील या यात्रेत सहभागी झाल्याने हरे कृष्णा, हरे रामाचा जयघोष आणि त्यांचे नृत्य याची वेगळी छाप रथयात्रेत पडली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -