घरमहाराष्ट्रजळगाव मारहाण प्रकरण : उद्या पत्रकारांची राज्यभर निदर्शने; कुचकामी कायद्याची करणार होळी

जळगाव मारहाण प्रकरण : उद्या पत्रकारांची राज्यभर निदर्शने; कुचकामी कायद्याची करणार होळी

Subscribe

मुंबईत हुतात्मा चौकात सर्व पत्रकार एकत्र जमून हुतात्म्यांना अभिवादन करतील व त्यानंतर पत्रकारांना संरक्षण देण्यात कुचकामी ठरलेल्या कायद्याची होळी करण्यात येणार आहे.

मुंबई : लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून प्रसारमाध्यमे, पत्रकारांकडे बघितले गेले पाहिजे. त्याच पत्रकारांवर दिवसेंदिवस हल्ले वाढत आहेत. पोलिसांत तक्रार करूनही पत्रकारांना संरक्षण देणाऱ्या कायद्याअंतर्गत हल्लेखोरांवर व त्यांच्या सुत्रधारांवर कायदेशीर कारवाई होत नाही. पाचोरा येथे पत्रकार संदीप महाजन यांना आमदार किशोर पाटील यांनी अर्वाच्च शिव्या दिल्या आणि नंतर त्यांच्यावर गुंडांकरवी जीवघेणा हल्लाही करण्यात आला. याच्या निषेधार्थ पत्रकारांच्या 11 संघटनांनी 17 ऑगस्ट रोजी मुंबईसह राज्यात तालुक्याच्या ठिकणी पत्रकार राज्यभर निदर्शने करणार आहेत.(Jalgaon Beating Case Statewide protests by journalists tomorrow Ineffective law will do Holi)

मुंबईत हुतात्मा चौकात सर्व पत्रकार एकत्र जमून हुतात्म्यांना अभिवादन करतील व त्यानंतर पत्रकारांना संरक्षण देण्यात कुचकामी ठरलेल्या कायद्याची होळी करण्यात येणार आहे. त्यासाठी सर्व पत्रकारांनी एकत्रितपणे उपास्थित राहावे, असे आवाहनही करण्यात आले आहे. यासंदर्भातील माहिती पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक एस. एम. देशमुख यांनी दिली आहे.

- Advertisement -

पाचोऱ्यातील पत्रकार महाजन यांना झाली होती माराहण

पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांना आमदार किशोर पाटील यांनी दिलेल्या अर्वाच्च शिव्या आणि नंतर त्यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यासाठी 17 ऑगस्ट रोजी मुंबईसह राज्यभर निदर्शने करून पत्रकार संरक्षण कायदयाची होळी करण्याचा निर्णय मुंबईत शुक्रवारी पार पडलेल्या 11 पत्रकार संघटनांच्या बैठकीत घेण्यात आला आहे. त्यानंतर पत्रकारांच्या 11 संघटनांच्या प्रतिनिधींनी शुक्रवारी राज्याचे राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेऊन एका निवेदनाद्वारे संबंधित बेजबाबदार आमदार किशोर पाटील यांच्यावर आणि त्यांच्या गुंडांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली. त्या दिवशी राज्यपाल बैस यांनीही पत्रकारांवर हल्ला होणे म्हणजे चुकीचे असल्याचे सांगितले. तसेच, सदर घटनाप्रकरणी आपण स्वतः जातीने लक्ष देणार असल्याचे सांगितले.

हेही वाचा : पहिल्या महिला बसचालकाची न्यायासाठी मुख्यमंत्र्यांकडे धाव; अधिकाऱ्यांकडून दुजाभाव, नोकरीवरुनही काढले

- Advertisement -

कुचकामी कायद्याची होळी करण्याचा एकमताने निर्णय

सदर बैठकीच्या आरंभी एस.एम.देशमुख यांनी पाचोरयातील घटनेची सविस्तर माहिती देऊन सर्व पत्रकार संघटनांनी एकत्र येऊन आमदाराच्या दादागिरीच्या विरोधात आवाज उठविला पाहिजे, असा आग्रह धरला. तेव्हा सर्व उपस्थित संघटनांच्या प्रतिनिधींनी त्यास संमती दर्शवत 17 ऑगस्ट रोजी राज्यभर निदर्शने करून पत्रकारांचे संरक्षण करण्यास निष्प्रभ ठरलेल्या पत्रकार संरक्षण कायद्याची होळी करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी उपस्थित सर्वच संघटनांच्या प्रतिनिधींनी आ.किशोर पाटील यांच्या अरेरावीचा निषेध करीत आ.किशोर पाटील व मारहाण करणारे गुंड यांच्या विरोधात पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची व कायदेशीर कडक कारवाई करण्याची मागणी केली. सुसंस्कृत महाराष्ट्रात कायदे मंडळाचा एक सदस्यच कायदा हातात घेऊन आपल्या असंस्कृतपणाचे दर्शन घडवतो आणि वरती “होय मीच शिव्या दिल्या, काय करायचं ते करा अशी” अशी मस्तवाल भाषा वापरतो हे चिंताजनक, संतापजनक आणि किळसवाणे असल्याने त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी मुख्यमंत्री, गृहमंत्री आदिंकडे संयुक्त निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

हेही वाचा : शरद पवार केंद्र सरकारविरोधात आक्रमक, केंद्रीय शिक्षण विभागाने काढलेल्या आदेशाला केला विरोध

वर्षभरात 46 पत्रकारांवर हल्ले

महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदा असला तरी त्याची अंमलबजावणी होत नसल्याने पत्रकारांवरील हल्ल्याच्या घटना वाढल्या आहेत. राज्यात गेल्या वर्षभरात ४६ पत्रकारांवर हल्ले झाले आहेत. पोलीस पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हे दाखल करायलाही टाळाटाळ करीत असल्याने हा कायदा सर्वार्थाने कुचकामी ठरला असल्याने पत्रकार संरक्षण कायदयाची होळी करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.राज्यातील पत्रकार संघटनांनी, पत्रकारांनी एकत्र येत १७ ऑगस्ट रोजी आपल्या तालुक्याच्या तहसिल आणि आणि जिल्ह्याच्या ठिकाणी कलेक्टर ऑफिससमोर निदर्शने करून पत्रकार संरक्षण कायदयाची होळी करावी, असे आवाहन सर्व पत्रकार संघटनांच्यावतीने करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -