घरमहाराष्ट्रबीडमधील घटनांवर जरांगे पाटील स्पष्टच बोलले; एखाद्या पोरावर गुन्हा दाखल केला तर...

बीडमधील घटनांवर जरांगे पाटील स्पष्टच बोलले; एखाद्या पोरावर गुन्हा दाखल केला तर मी…

Subscribe

जालना : मराठा आरक्षणाबाबत राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत मराठा आरक्षणासाठी दोन अतिशय मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. मात्र सरकारने घेतलेला एकही निर्णय आम्हाला मान्य नाही. त्यामुळे सरकारने मराठा आरक्षणाबाबत आज रात्री किंवा उद्या दिवसभरात ठोस निर्णय नाही घेतला तर, उद्या संध्याकाळपासून मी पुन्हा पाणी बंद करणार, असे स्पष्ट करतानाच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी बीडमधील घटनांवर भाष्य केले. (Jarange Patil spoke clearly on the events in Beed If a case is filed against a boy Eknath Shinde)

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, बीडमध्ये संचारबंदी लावली त्याबद्दल आमचं काही मत नाही. ते कोणी केलं, काय केलं हे माहित नाही. परंतु गोर-गरीबांच्या लेकरांना तुमचा एसपी आणि कलेक्टर गुन्हा दाखल करत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विशेष करून सांगतो की, एसपी आणि कलेक्टर यांना तिथून हटवणे किंवा मराठा समाजाला आंदोलन न करू देणे हे प्रकर तातडीने बंद करायला लावा. हे मी दुपारी सांगितले होते, ते बंदही झाले असतील माहित नाही. पण आंदोलन आधी आणि नंतर तुमची संचारबंदी आहे. त्यामुळे तुमची संचारबंदी तिथे बाजूला ठेवा आणि जर एखाद्या पोरावर गुन्हा दाखल केला आणि त्याला त्रास द्यायचा प्रयत्न केला तर, मी स्वत: बीडमध्ये जाऊन एसपी, जिल्हाधिकाऱ्यांसमोर जाऊन बसेन. त्यावेळी 5 लाख किंवा 10 लाख मराठा समाज येईल हे सांगता येत नाही. पण मी बीडला आल्यास मराठा समाजाची ताकद सरकारला समजेल, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.

- Advertisement -

सविस्तर बातमी लवकरच

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -