घरपालघरमीरा-भाईंदरमध्ये उद्यापासून साखळी उपोषणाला सुरूवात

मीरा-भाईंदरमध्ये उद्यापासून साखळी उपोषणाला सुरूवात

Subscribe

उपोषण शांततेत करत निषेध व्यक्त करण्यात येणार आहे व दररोज ५ जण उपोषणाला बसणार आहेत.उपोषणाला बसणार्‍या मराठ्यांकरिता पद्मजा हॉस्पिटलमार्फत सर्व वैद्यकीय सुविधा ठेवण्यात आल्या आहेत.

भाईंदर :- मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी चाळीस दिवसांची मुदत देऊनही सरकारने आरक्षण संदर्भात कोणताही सकारात्मक निर्णय नघेतल्याने अखेर मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी २५ ऑक्टोबर पासून बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे. राज्यातील मराठा समाज एकवटला असून मीराभाईंदर सकल मराठा समाजाने शहरात बैठक घेऊन जरांगे पाटलांना पाठिंबा जाहीर केला आहे.गोल्डन नेस्ट चौक, छत्रपती शिवाजी महाराज मार्ग, भाईंदर पूर्व या ठिकाणी आज १ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजल्यापासून बेमुदत साखळी उपोषण करण्यात येणार आहे. उपोषण शांततेत करत निषेध व्यक्त करण्यात येणार आहे व दररोज ५ जण उपोषणाला बसणार आहेत.उपोषणाला बसणार्‍या मराठ्यांकरिता पद्मजा हॉस्पिटलमार्फत सर्व वैद्यकीय सुविधा ठेवण्यात आल्या आहेत.

काशीमीरा येथे आयोजित केलेल्या बैठकीला शहरातील सर्व राजकीय पक्षांच्या स्थानिक नेत्यांसह मराठा समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता. आरक्षण मिळेपर्यंत आता मराठे माघार घेणार नाहीत, असे मराठा समाजामार्फत सांगण्यात आले आहे. त्यामुळे आक्रमक भूमिका न घेता मराठ्यांनी शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचे ठरवले आहे. मराठा असलेल्या मुख्यमंत्र्यांनी कोणत्याही दबावाखाली न येता आरक्षण देण्याची मागणी मीराभाईंदर सकल मराठा समाजाकडून करण्यात आली आहे. मीराभाईंदर शहरात मोठ्या संख्येने मराठा समाज आहे. काहीजण कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात मोठ्या हुद्द्यावर राजकारणात अथवा इतर क्षेत्रात कार्यरत आहेत. मात्र मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी कोणत्याही गोष्टी अथवा राजकारण मध्ये न आणता एक मराठा म्हणून सर्वजण उपस्थित असतात व एकजुटीने काम करतात व करणार असल्याचे मीरा भाईंदर सकल मराठा समाजाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

 

सकल मराठा समाज वसई संस्थेमार्फत मनोज जरांगे यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे.त्यासाठी एक दिवसीय लाक्षणिक साखळी उपोषण 2 नोव्हेंबर रोजी विरार पूर्व येथील स्काय वॉक खाली आयोजित केले आहे. सर्वांनी येऊन आपला सहभाग नोंदवण्याचे आवाहन संस्थेचे कार्याध्यक्ष विश्वास सावंत यांनी केले आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -