घरफोटोगॅलरीPHOTO : केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांचा मुंबईच्या लोकल ट्रेनमधून प्रवास

PHOTO : केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांचा मुंबईच्या लोकल ट्रेनमधून प्रवास

Subscribe

मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखली जाणारी लोकल ट्रेन ही कायम प्रवाशांनी भरेली असते. या लोकल ट्रेनने लाखोच्या संख्यने लोक प्रवास करत असतात. मुंबईच्या लोकल ट्रेनचे सर्वांच आकर्षण आहे. यात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन देखील अपवाद नाही.निर्मला सीतारामन यांचा लोकल ट्रेनमधून प्रवास केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सीतारामन यांच्या लोकल ट्रेनच्या प्रवासाचा व्हिडीओ राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट केला आहे.

 

- Advertisement -

निर्मला सीतारामन यांनी शनिवारी (24 फेब्रुवारी) बदलापूर एसी लोकलमधून प्रवाश केला. यात सीतारामन यांनी घाटकोपर ते कल्याणदरम्यान प्रवास करताना प्रवाशांशी संवाद साधला.

- Advertisement -

निर्मला सीतारामन यांनी दुपारी 12.42 वाजता घाटकोपर ते कल्याण असा प्रवास केला. या प्रवासात निर्मला सीतारामन यांनी प्रवाशांशी संवाद साधला.

यानंतर निर्मला सीतारामन यांनी परत येताना कल्याण येथून 5.39 वाजता सुटणारी नॉन-एसी लोकल पकडली. यावेळी देखील निर्मला सीतारामन यांनी प्रवाशांशी संवाद साधला. त्यासोबत रेल्वे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांशी देखील चर्चा केली.

देवेंद्र फडणवीसांनी निर्मला सीतारामन यांच्या लोकल ट्रेनमधील व्हिडीओ शेअर करत ‘तिसरी बार मोदी सरकार, वो भी 400 पार’, अशी कॅप्शन ट्वीटला फडणवीसांनी दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -