घरमहाराष्ट्रपवारांच्या घरावर हल्ला, एसटी कर्मचाऱ्यांना कोणत्या पक्षाचा पाठिंबा?; जयंत पाटलांचा रोख कोणावर?

पवारांच्या घरावर हल्ला, एसटी कर्मचाऱ्यांना कोणत्या पक्षाचा पाठिंबा?; जयंत पाटलांचा रोख कोणावर?

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानावर आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर वातावरणतारलं आहे. या हल्ल्यामागे नेमका कोणाचा हात आहे? याबाबतचा तपास पोलीस करत आहेत. दरम्यान, जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला कोणत्या पक्षाने पाठिंबा दिला, त्यामुळे शंकेची पाल मनात आहे, असं जयंत पाटील म्हणाले.

जयंत पाटील यांच्या वक्तव्यानंतर त्यांचा रोख भाजपवर असल्याची चर्चा आहे. कारण भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर या आंदोलनात होते. त्यानंतर त्यांनी त्या आंदोलनातून माघार घेतली. दरम्यान, गुरुवारी न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर एसटी कर्मचाऱअयांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी भाजपच्या नेत्यांचे जाही आभार मानले. त्यामुळे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यानंतर आता जयंत पाटील यांचा देखील रोख भाजपकडे आहे.

- Advertisement -

जयंत पाटील नेमकं काय म्हणाले?

तपासाच्या अंती काय आहे हे समजेल. शंभर टक्के षडयंत्र आहे. सरकार पाडण्याचे प्रयत्न संपले. चौकशीचा ससेमीरा संपला. आता काहीच होत नाही, असं ज्या व्यक्तींना वाटतं…कोणाचं नाव आलेलं नाही, मी कोणावर आरोप करणार नाही. पण असं कधी झालेलं नाही आणि कोणत्याही असंतोषात काड्या टाकण्याचं काम काही लोक महाराष्ट्रात करत आहेत. शासनाच्या कर्मचाऱ्यांचं आंदोलन कोणत्याही पक्षाने हातात घेतलं नव्हतं. महाराष्ट्रात एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात काही पक्ष पुढं सहभागी होऊन ज्यात जेवढं काही पेटवता येईल तेवढा प्रयत्न झाला. म्हणून अनेकांच्या मनात शंकेची पाल आहे, असं जयंत पाटील म्हणाले.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -