घरताज्या घडामोडीसंसार का मोडला? याचे उत्तर उद्धव ठाकरेंनी वेळोवेळी दिलंय, जयंत पाटलांचा महाजनांना...

संसार का मोडला? याचे उत्तर उद्धव ठाकरेंनी वेळोवेळी दिलंय, जयंत पाटलांचा महाजनांना टोला

Subscribe

महाविकास आघाडी सरकारला २ वर्षांचा कालावधी पुर्ण झाला आहे. भाजप नेत्यांकडून महाविकास आघाडी सरकारवर आणि शिवसेनेवर टीकास्त्र सुरुच आहे. सत्ताधारी आणि विरोधक सध्या नेत्यांच्या मुलांच्या लग्नकार्यात आमने सामने येत आहेत. यावेळी देखील दोघांमध्ये टोलवाटोलवी सुरुच आहे. जळगावमध्ये शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांच्या मुलाच्या लग्नाला भाजप नेते गिरीश महाजन आणि राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील आणि नवाब मलिक देखील उपस्थित होते. यावेळी महाजनांनी सत्ताधाऱ्यांवर टोला लगावला असता जयंत पाटील आणि नवाब मलिकांनीही प्रत्युत्तर दिलं आहे.

भाजप नेते गिरीश महाजन यांनी शिवसेना आणि भाजपची युती तुटल्यावर भाष्य करताना आमचा २५ वर्षांचा संसार तुम्ही मोडला असा सत्ताधाऱ्यांना टोला लगावला आहे. तसेच विरोधी पक्षाकडून तुम्हाला शुभेच्छा घ्यावा लागतील असे गिरीश महाजन म्हणाले आहेत. यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि राष्ट्रवादी नेते नवाब मलिक यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

- Advertisement -

युती तुटल्याने त्यांना दुःख

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी महाजन यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. पाटील म्हणाले की, त्यांची ती खंत आहे. दुःख आहे परंतु आम्ही त्यावर फारस लक्ष देत नाही. त्यांचा संसारा तुटला यावर उद्धव ठाकरे यांनी वेळोवेळी उत्तर दिलं असल्याचे जयंत पाटील म्हणाले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी महाजनांवर चांगलीच टीका केली आहे. महाजन यांनी संसार जुळत असताना शुभ दिनी, शुभ बोलायला पाहिजे होते. ते अपशब्द बोलतात. भाजपची सत्तेतून बाहेर राहिल्याची खदखद दिसून आली असल्याचेही नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. गुलाबराव पाटील यांच्या मुलाच्या लग्नाला नेते मंडळी जमले होते परंतु राजकीय टोलवा टोलवी करण्यास सत्ताधारी आणि विरोधक मात्र विसरले नाही.

- Advertisement -

हेही वाचा : पहाटेच्या शपथविधीचा फडणवीसांना पश्चाताप, म्हणाले जशास तसे उत्तर…


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -